जातप्रमाणपत्रासाठी कोळी महासंघाचे साकडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |

पाचोर्‍यात प्रांतधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार यांना निवेदन


 
पाचोरा : 
 
भारतीय जातनिहाय झालेल्या सण 2001 ते 2011 च्या जनगणनेनुसार आरक्षित वार्डात प्रत्येक मतदारांना त्यांच्या प्रतिज्ञा पत्राच्या आधारावर अनुसूचित जमातीचे फॉर्म सीमध्ये जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी कोळी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सैंदाणे यांच्या नेतृत्वाखाली येथील प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रमेश लक्ष्मण राजगुरु यांना भडगाव तालुक्यातील गुढे, पिचर्डे, आमडदे, वडजी, बातसर, भडगाव येथील 125 अर्जदाराचे प्रमाणपत्र व निवेदन देण्यात आले.
 
भारतीय जातनिहाय जनगणना अहवालानुसार प्रत्येक मतदाराला त्यांच्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्याचे हक्काचे जातप्रमाणपत्र देणे हे ही जबाबदारी प्रांताधिकारी यांची असताना सुद्धा सेतू सुविधा केंद्राच्या व महाराष्ट्र शासनाने ज्या कायद्यांतर्गत सक्षम अधिकारी यांच्याकडे जात प्रमाणपत्र देण्याच्या जबाबदार्‍या देण्यात आल्या आहेत.
 
मात्र तेच अधिकारी सोयीस्कररित्या आदिवासी कोळी समाजाची सेतू सुविधा केंद्रामार्फत न करता संगनमताने अनाधिकृरित्या नेमलेल्या दलालामार्फत समाजाची आर्थिक लुबाडणूक करून फसवणूक करीत आहेत.
 
जणू भ्रष्टाचारासाठीच ?
 
सेतू सुविधा केंद्राचा वापर जणू फक्त भ्रष्टाचार करण्यासाठीच सुरू आहे. त्याचा गैरफायदा घेऊन काही आदिवासी अर्जदारांची जाणीवपूर्वक अडवणूक करतात. चोपडा तालुक्यातील सुरेश एकनाथ कोळी या तरुणाला गळफास घेऊन आत्महत्या करायला भाग पाडले हे सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ व सत्य आहे.
 
सेतू सुविधा कक्षाच्या माध्यमातून होत असलेला गैरकारभार, आर्थिक लुबाडणूक व अडवणुकीबाबत तसेच अर्जदाराला सक्षम अधिकार्‍याने दिलेले बी फाम मधील प्रमाणापत्र बदलून सी फार्ममध्ये देण्यासाठी सेतू सुविधा कक्षाच्या माध्यमातून फार मोठ्या रकमेची मागणी केली जाते, याची सुध्दा चौकशी करून सत्य बाहेर येणे गरजेचे आहे असे निवेदनात म्हटले आहे.
 
अण्णा कोळी (भडगाव तालुका अध्यक्ष),छोटू सैंदाणे (चाळीसगाव तालुका अध्यक्ष), प्रदीप कोळी, सुनील मोरे (पाचोरा), सुनील अशोक मोरे, शनैश्वर कोळी, भिवसन चिंधा कोळी, अमृत कोळी, दिलीप कोळी, अजय कोळी, संजय राघो कोळी (गुढे), दीपक कोळी (पिचर्डे),ईश्वर शेवरे (गिरड), संभाजी कोळी (आमडदे), नेहरू शेवरे (वडजी) आदीबंधू व भगिनी उपस्थित होत्या.
 
 
मोहिम राबविणार
 
कोळी समाजाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सैनदाने यांनी सांगितले की, नाममात्र कागदपत्रावर समाजाला जातप्रमाणपत्र मिळावे म्हणून ही मोहीम राबविण्यात येत आहे .
 
चोपडा,अमळनेर, भुसावळ, मुक्ताईनगर, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा प्रमाणे उर्वरित आठ तालुक्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले जात प्रमाणपत्र मुक्त समाज झाला पाहिजे सरकार अन्याय करत असेल तर त्यांची जागा त्यांना दाखविल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी शेवटी सांगितले
 
@@AUTHORINFO_V1@@