ऐतिहासिक; टाटा Nexonला मिळाले ५ स्टार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |



मुंबई : टाटा मोटर्सची Nexon ही कार ५ स्टार क्रॅश टेस्ट पास करणारी भारतातील पहिली कार कार ठरली आहे. कार सुरक्षा क्षेत्रात कार्यरत असणारी Global NCAP या संस्थेने याबाबतची घोषणा केली आहे. Global NCAP संस्थेने घेतलेल्या चाचणीमध्ये टाटाच्या S4M कॅटेगिरीमधील SUV Nexon कारला १७ पैकी १६.०६ गुण मिळाले आहेत. अशाप्रकारच्या चाचणीमध्ये SUV Nexon ही पहिली अशी कार आहे जीला सर्वात जास्त गुण मिळाले आहेत. जागतिक बाजारात भारतीय कारची निंदा करणाऱ्यांना ही मोठी चपराक समजली जाते.

अशाप्रकारच्या क्रॅश टेस्टमध्ये या कारला यापूर्वी पाच पैकी चार स्टार मिळाले होते. यानंतर पाच स्टार मिळवण्यासाठी टाटा कंपनीने या कारमध्ये अनेक बदल केले होते. गाडीच्या चारही चाकांमध्ये ABS, कारमधील प्रत्येक सीट बेल्टवर रिमाइंडर लावण्यात आले. यानंतर या कारला ५ स्टार देण्यात आले आहेत. यामुळे भारतीय ऍटोमोबाइल क्षेत्रातील हा ऐतिहासिक क्षण असल्याचे मानले जात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@