दुष्काळाच्या उपाययोजना करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |

‘मनसे’चे तहसीलदारांना निवेदन

 
 
तळोदा : 
 
तळोदा तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर झाला आहे , पण त्यात सरकारचे धोरण काय? व त्वरीत उपाय योजना करण्यात याव्यात त्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडून नुकतेच तलसीदार यांना निवेदन देण्यात आले.
 
निवेदनात म्हटले आहे की, कांही दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारने दुष्काळग्रस्त भागाची घोषणा केली त्यांत तळोदा तालुकाही दुष्काळ ग्रस्त म्हणून गोषीत करण्यात आला.
 
तळोदा तालुक्यात किती गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे? पिण्याचे पाणी पोहचविण्याबाबत प्रशासनाच्या काय योजना आहेत? किती व कोणत्या खरीप पिकांचे कुठे व कोणाचे नुकसान झाले? पिकांची नुकसान भरपाईबाबत प्रशासनाचे धोरण काय? कुठल्या गावात किती गुरे चारा पाणी व आसरा यांपासून वंचित आहेत? जनावरांना आसरा देण्याबाबत आणि चारा छावण्या सुरू करणे बाबत प्रशासनाचे धोरण काय ? किती लोकांना व कुठल्या गावातील लोकांना रोजगार दिला पाहिजे? रोजगारसाठी गाव सोडून दुसर्‍या गावी स्थलांतर करावे लागू नये म्हणून शासनाने आपल्या स्तरावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी मनसेचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष अजयभाऊ सोनवणे यांनी केली आहे.
 
याप्रसंगी मनसे तालुका अध्यक्ष कल्पेश सुर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष हरीश पटेल, शहर अध्यक्ष सुरज माळी, विनय सोनार, भूषण सुर्यवंशी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@