धरणगाव येथे उद्यापासून श्रीमद्भागवत संकीर्तन सप्ताह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |

ग्रंथदिंडी , शोभायात्रेने होणार समारोप


 
 
धरणगाव : 
 
येथील गणेशनगरध्ये शनिवारपासून श्रीमद् भागवत व संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे भागवत सप्ताहचे हे आठवे वर्ष आहे. या सप्ताहात श्रीमद् भागवतचे निरूपण शहादा येथील कथा प्रवक्ते खगेंद्रजी महाराज करणार आहेत.
 
8 डिसेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत भागवत कथा, संध्याकाळी 6 ते 7 हरिपाठ व रात्री 8.30 ते 10.30 कीर्तन होणार आहे.
 
यावेळी श्रीमद् भागवत संहितापाठ धुळे येथील शास्त्री गुरुजी सांगतील. मुकुंदा महाराज ढेकु, गुलाबराव महाराज लोण, सोपान महाराज मराठ खेडे, शशिकांत महाराज भावरखेडे, जितेंद्र महाराज म्हसावद, पोपट महाराज कासारखेेडे, रुपचंद महाराज दहीवद, चत्रभुज महाराज धरणगाव यांचे कीर्तन होणार आहे.तालुक्यातून या सप्ताहात भाविक येत असतात.
 
 
आयोजनासाठी एरंडोलचे माजी उपनगराध्यक्ष भिका लोहार, कोकिलाबाई लोहार यांच्या प्रेरणेने धरणगाव बालाजी पतसंस्थेचे संचालक ज्योती लोहार व दिनेश लोहार हे कुटुंबीय सहकार्य करीत असते.
 
यासाठी गणेशनगर मित्रपरिवार, शहरासह तालुक्यातील भक्तगण,पांडव ग्रुप, जगदंबा अक्वा ,राजकुमार फोटो, हॉटेल अमोल रेसिडेन्सी, सुदर्शन फोटो ,माऊली वारकरी शिक्षणसंस्था यांचे सहकार्य लाभले आहे.
 
पळसखेड तालुका पारोळा व संत सावता महाराज भजनी मंडळ धरणगाव, वारकरी शिक्षणसंस्था मधील विद्यार्थी गायनाचार्य, मृदुंगाचार्य म्हणून सेवा देणार आहेत.निवारी 15 रोजी समारोप व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी ग्रंथदिंडी व शोभायात्रेचे आयोजन आहे.
 
सप्ताहात होणार्‍या कार्यक्रमाचे नियोजन प्रा.सी.एस.पाटील, दिलीप पाटील, बुट्या पाटील यांच्यासह गणेशनगरवासी भाविक करीत आहेत. महाप्रसाद व भागवत कथेचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन दिनेश लोहार मित्रपरिवाराने केले आहे.
 
भागवत कथेसाठी सुमधुर संगीताची साथ सुदंमभाई चौधरी, कल्पेश जाधव, योगेश लोहार, दिपक गुरव शहादा आदी देणार आहेत.
या सप्ताहात तालुक्यासह जिल्ह्यातील सामाजिक ,राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर हजेरी लावत असतात.
 
 
आठ दिवस भक्तिमय वातावरणात भाविक वाहून निघतात. चार वर्षापूर्वी विदेशी पाहुण्यांनी देखील या सप्ताहात दोन दिवस सहभागी होऊन आनंद घेतला होता. भाविकांनी या कथेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@