राजस्थान, तेलंगणामध्ये मतदानाचे बिगुल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |



नवी दिल्ली : लोकसभेचे रणसंग्राम सुरु होण्याआधी छत्तीसगड, मिझोरम, मध्यप्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या ५ राज्यांची निवडणूक म्हणजे सेमी फायनल. त्यापैकी छत्तीसगड, मिझोरम आणि मध्यप्रदेशमध्ये निवडणूक झाली आहे. आता उरलेले २ राज्यांमध्ये मतदानाला शुक्रवारी सुरुवात झाली आहे. या सर्व मतदानाचे निकाल ११ डिसेम्बरला लागणार आहेत.

 

दुपारी १ वाजेपर्यंत तेलंगणामध्ये २३% तर राजस्थानमध्ये २२% मतदान झाले होते. तेलंगणा विधानसभेच्या ११९ जागांसाठी तर राजस्थानमध्ये १९९ जागांसाठी हे मतदान असणार आहे. राजस्थानमध्ये २०० जागांसाठी ५१,६८७ मतदान केंद्रावर निवडणूक होत आहे. तर १३० जागांवर भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, तेलंगणामध्ये ११९ जागांसाठी ३२,८१५ केंद्रांवर मतदान होत आहे. ११ डिसेंबरला जाहीर होणाऱ्या पाचही राज्यांच्या निकालावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@