माळी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा 23 डिसेंबरला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |

नोंदणीची 12 पर्यंत अंतिम मुदत; सहभागाचे आवाहन

वरणगाव : 
 
महाराष्ट्र माळी समाज महासंघ जळगाव जिल्हा आयोजित वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन येत्या 23 डिसेंबर रविवार रोजी जळगाव येथे पंचमुखी हनुमान मंदिराजवळील लाठी हायस्कूल जळगाव येथे सकाळी 10 ते 4 या वेळेत करण्यात आले आहे. समाजबांधवांनी या मेळाव्यास सपरिवार उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
 
उपवर युवक-युवतींचे सूचीमध्ये नाव नोंदणीकरीता 12 डिसेंबरपर्यंत अंतीम मुदत असल्याने पालकांनी परिचय पत्र भरुन द्यायचे आहे.
 
दरवर्षाप्रमाणे यंदाही महाराष्ट्र माळी समाज महासंघातर्फे समाजातील उपवर युवक-युवतींसाठी वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. वधू-वर परिचय मेळाव्याचे 19 वे वर्ष आहे. युवक-युवतींच्या पालकांना योग्य स्थळ मिळण्यासाठी वेळ, पैसा, दिवस खर्ची घालावे लागतात.
 
एकाच छताखाली योग्य स्थळ मुला-मुलींना भेटू शकेल, आणि खर्ची होणारा वेळ, पैसा वाचू शकेल. हाच दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र माळी समाज महासंघ या मेळाव्याचे आयोजन दरवर्षी करीत असते. येत्या 23 डिसेंबर रविवार रोजी सकाळी 10 ते 4 या हा मेळावा होणार आहे.
 
12 डिसेंबरपर्यंत विनोद पाटील (रावेर), दिनकर महाजन (यावल), भागवत बोंबटकर (मुक्ताईनगर), दिलीप माळी (बोदवड), नरेश महाजन (जामनेर), नितीन माळी (भुसावळ) यांच्यापैकी सोयीनुसार एका कार्यकर्त्याकडे परिचय पत्रक भरुन द्यावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष शालीग्राम मालकर, जिल्हाध्यक्ष दिनेश माळी, उपाध्यक्ष संतोष माळी यांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@