वाघळीत ग्राहक सेवा केंद्राचा शुभारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |

शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे यांच्याहस्ते उद्घाटन


 
वाघळी ता. चाळीसगाव :
 
येथील महा ई ग्राहक सेवा केंद्राचे बुधवारी उद्घाटन जि.प.शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
वाघळीत या सेतूमार्फत मिळणार्‍या सेवा सुविधांचा वाघळीच्या जनतेला फायदा होणार असून त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन सभापती पोपट तात्या भोळे यांनी केले.
 
वाघळी बसस्थानकाजवळच्या या ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, बीलभरणा, पैसे हस्तांतरण, आधारची कामे, सातबारा उतारा आदी दाखले मिळणार आहेत.
 
 
त्यामुळे वाघळीकरांना चाळीसगावात तहसीलमध्ये जाणे, हेलपाटी मारणे, दाखल्यासाठी जाणारा वेळ वाचणार आहे. ऑनलाईनव्दारे मिळणार्‍या सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध झाल्या आहेत.
 
 
त्यासाठी नागरिकांनी गावात उपलब्ध होणार्‍या सेवा सुविधांचा फायदा घ्यावा, असे ग्राहक सेवा केंद्रांचे संचालक आदित्य झगडे यांनी केले. वाघळीचे सरपंच विकास चौधरी, राजू हाडपे, पितांबर चौधरी, भास्कर बेडिस्कर, एकनाथ महाजन, अशोक भोळे, संतोष केवट आदी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@