‘बेलगंगा’च्या गाळप हंगामाचा आज शुभारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |

श्रीश्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांची उपस्थिती

 
 
चाळीसगाव : 
 
राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांनी विकत घेतलेला एकमेव साखर कारखाना म्हणून चर्चिला गेलेला व चेअरमन चित्रसेन पाटील यांच्यासह अंबाजी टीमच्या अथक परिश्रमातून सुरू होत असलेल्या भोरस ता. चाळीसगाव येथील बेलगंगा साखर कारखानाच्या गव्हाण पूजन व गळीत हंगामाचा शुक्रवार 7 रोजी साडेदहा वाजता कारखाना कार्यस्थळावर शुभारंभ होणार आहे.
 
अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे असतील. सिद्धेश्वर आश्रम बेलदारवाडीचे हभप ज्ञानेश्वर माऊली, परमपूज्य स्वामी केशवानंद सरस्वती यांची उपस्थिती लाभेल.कार्यक्रमाला जिल्ह्यातील मंत्री तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
 
उपस्थितीचे आवाहन बेलगंगा साखर कारखाना चेअरमन चित्रसेन पाटील, कार्यकारी संचालक नामदेव पाटील यांच्यासह संचालक प्रवीणभाई पटेल, दिलीप चौधरी, प्रेमचंद खिवसरा, माणिकचंद लोढा, दिनेशभाई पटेल, अरुण निकम, डॉ. एम. बी. पाटील, विजय अग्रवाल, अ‍ॅड. धनंजय ठोके, उद्धवराव महाजन, किरण देशमुख, अजय शुक्ला, सुशील जैन, अशोक ब्राह्मणकर, श्रीराम गुप्ता, सुजित वर्मा, रफिक शेख, प्रशांत मोराणकर, अभय वाघ, डॉ. मंगेश वाडेकर, जगदीश पाटील, माजी व्हॉईस चेअरमन रवींद्र पाटील, नीलेश वाणी, निलेश निकम, एकनाथ चौधरी, हिंमत पाटील, डॉ. अभिजित पाटील, एम.एम. पाटील, शरद मोराणकर, प्रदीप धामणे, हिंमत पटेल, गोरख राठोड, जगदीश पाटील, डॉ. मोनिका पाटील, वर्षा महाजन, कुसुमताई भामरे, पन्ना लोढा यांच्यासह अंबाजी ग्रुपचे सर्व भागधारक व कर्मचार्‍यांनी केले आहे.
125 कोटींची उलाढाल होणार : चित्रसेन पाटील
 

 
 
गेल्या दशकापासून बंद असलेल्या कारखान्यामुळे परिसरातील अर्थकारण बिघडल्याचा तालुका वासियांनी अनुभव घेतला. आता तालुक्याच्या एकूण दळणवळणात सुमारे 125 कोटींची वार्षिक उलाढाल होईल व प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष हजारो हातांना रोजगार उपलब्ध होणार असल्याने प्रत्येकाच्या चेहर्‍यावर समाधान दिसून येत आहे.
 
गेल्या दीड वर्षांपासून कारखाना सुरू करण्याची चळवळ हाती घेतली देवासारखी माणसे भेटली आणि गाळप हंगाम सुरू करता आला. मोठा अवधी याकामी लागला. उतारा नावावर होण्यास विलंब झाल्याने प्रचंड आर्थिक कसरत करावी लागली होती.
 
अनेक दिवस रात्र जागून आणि ताणतणावात काढल्या मात्र तालुक्यातील जनता जनार्दन यांचा आशीर्वाद आणि पाठिंबा राहिला, त्यामुळे त्यांना पाठबळ मिळत राहिल्याने मनाशी ठरवलेल्या कर्तव्याशी ठामपणे प्रामाणिक राहून आज कारखाना गाळपासाठी सज्ज झाल्याचे चेअरमन चित्रसेन पाटील यांनी सागितले.
 
चार हजार लोकांना रोजगार
 
चार हजार लोकांना रोजगार व 125 कोटींची उलाढाल अजून कशी वाढवता येईल यासाठी ते प्रयत्न करणार असून आणि माझा तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी कायम कार्यरत राहणार असल्याचे पाटील यांनी सागितले.
 
कारखाना तालुक्यातील भूमिपुत्रांनी सुरू करावा यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक कै. वाडीलाल राठोड हे आग्रही होते, जिल्हा बँकेचे अधिकारी व भूमिपुत्रांमध्ये राठोड यांनी समन्वयाची भुमिका घेतली त्याचा मोठा आधार अंबाजी ट्रेडिंग कंपनीचे संचालक यांना मिळाला त्यांच्या आग्रही भूमिकेतून कारखाना पुन्हा सुरू झाला अशी कृतज्ञता चित्रसेन पाटील यांनी व्यक्त केली.
 
@@AUTHORINFO_V1@@