कृष्णमुर्ती सुब्रमण्यन देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |

 
 

नवी दिल्ली : डॉ. कृष्णमुर्ती सुब्रमण्य यांची देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या इंडियन स्कुल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक म्हणून ते कार्यरत असून वित्त विश्लेषण केंद्राचे ते कार्यकारी संचालक आहेत.

 

माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांच्या राजीनाम्यामुळे हे पद गेल्या पाच महिन्यांपासून रिक्त झाले होते. ३० जून रोजी केंद्र सरकारने या पदासाठी अर्ज मागवले होते. त्यानुसार आता कृष्णमुर्ती सुब्रमण्य यांची या पदावर नियुक्ती झाली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली. बॅंकींग तज्ज्ञ म्हणून कुष्णमुर्ती प्रसिद्ध आहेत. गेली दहा वर्षे ते भांडवली बाजारातील नियामक संस्था सेबीआणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या समितीवर कार्यरत आहेत. याशिवाय त्यांनी बंधन बॅंकेच्या संचालक मंडळावरही त्यांनी काम पाहीले होते.

 

शिकागो येथून त्यांनी पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले आहे. आयआयटीआणि आयआयएममधून ते अव्वल राहीले आहेत. बॅंकींग क्षेत्रातील संशोधन, विधी वित्त, विकासदर आणि सहकार क्षेत्रावर आधारित त्यांच्या संशोधन पुस्तिका प्रसिद्ध आहेत. सुब्रमण्यन यांनी आघाडीच्या वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखनही केले आहे. न्युयॉर्कमध्ये जे.पी. मॉर्गन या कंपनीत वित्तीय सल्लागार म्हणून त्यांनी सुरुवात केली. भारतातील प्रमुख गुंतवणूक कंपन्यांसाठी त्यांनी संशोधन केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@