कुमारस्वामींच्या राजकारणामुळे ४ लाख मुले उपाशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |
 

बंगळुरू : भारतातील विविधतेने नटलेल्या परंपरांच अन्न पदार्थांची उपलब्धता असूनही उपासमारीचे कारण ठरत आहेत. कर्नाटकमध्ये पोषण आहारात दिल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये कांदा लसूणाची सक्ती केल्याने आता नवा वाद उफाळून आला आहे. यामुळे इस्कॉनशी संलग्न असलेल्या अक्षय पात्र या फाऊंडेशनने पोषण आहार वितरीत करण्यास नकार दिला आहे. जैन धर्मीय संस्था असल्याने पोषण आहारात कांदा-लसूण वर्ज्य आहे. मात्र, कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी पोषण आहारात कांदा लसूण यांचा वापर करावा, असा आग्रह केला. अक्षय पात्र या संस्थेने तसे करण्यास नकार दिल्याने या राज्यातील ४ लाख ४३ हजार मुलांच्या पोषण आहाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.


संस्था मानत असलेल्या तत्वांनुसार, सात्विक अन्नपदार्थ देण्यावर भर दिला जात आहे. कांदा आणि लसूण हे तामसिक या प्रकारात येत असल्याने ते वर्ज्य केले आहेत. मात्र, हे पदार्थ पोषण आहारात आवश्यक आहेत, असा अट्टाहास कर्नाटक कॉंग्रेस आणि मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केला आहे. गेले काही दिवस कॉंग्रेसने हा वादाचा आणि प्रतिष्ठेचा मुद्दा केल्याने राज्यातील मुलांचा पोषण आहार बंद होण्याची वेळ आली आहे.

 

केवळ गुरुवार वगळता पोषण आहारात जेवणात कांदा लसणाचा सामावेश करावा, असे आदेश कुमारस्वामी सरकारने या संस्थेला केले आहेत. दरम्यान अक्षय पात्र या संस्थेचा सरकारशी या वर्षाचा करारही नाही, तरीही इतक्या मोठ्या प्रमाणावर मुलांना दररोज हा आहार पोहोचवला जातो. तरीही केवळ धर्माचा मुद्दा म्हणून राजकारण केले जात असल्याचा आरोप सरकारवर केला जात आहे.

 

अक्षय पात्र संस्थेने जाहीर केलेल्या निवेदनानुसार, आम्ही सर्वसामावेशक आणि पौष्टीक आहार मुलांना देत असल्याचे म्हटले आहे. कर्नाटक सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसारच आहार वाटप होत असून सरकारच्या सृदृढ आरोग्यासाठीच्या अभियानामध्ये आम्ही मदत करत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.
इस्कॉनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही पुरवलेले पदार्थ पौष्टीक असून संतुलन आहाराची नियामके पाळली जात असल्याचे सांगितले आहे. सरकारने अक्षय पात्र आणि अन्य संस्थांची तुलना करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@