इकबाल मेमन ऑफिसर यांची रेडक्रॉस रक्तपेढीला भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |

जळगाव : 
 
ऑल इंडियन मेमन फेडरेशनचे प्रेसिडेंट ईकबाल मेमन ऑफिसर यांची रेडक्रॉस रक्तपेढीला सदिच्छा भेट दिली. रेडक्रॉसचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी रक्तपेढीच्या प्रत्येक भागात पाहणी केली.
 
रक्तसंकलनापासून तर रक्तपिशवी रूग्णाला मिळेपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती तसेच रक्त व रक्तघटकाची गुणवत्ता कशी राखली जाते हे जाणून घेतले.
 
उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, रक्तपेढी चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, सहसचिव राजेश यावलकर, सहकोशाध्यक्ष अनिल कांकरीया, शेखर सोनाळ्कर, सुभाष साखला, धनंजय जकातदार, लक्ष्मण तिवारी, उज्ज्वला वर्मा, संजय साळुंके उपस्थित होते. उपाध्यक्ष गनी मेमन यांनी रेडक्रॉस राबवित असलेल्या विविध सामाजिक कार्याची माहिती दिली.
 
ऑफिसर यांनी रेडक्रॉस मार्फत जिल्हयाभरात सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले. या प्रसंगी मजीद मेमन, गफ्फार मलिक, करीम सालार व मेमन समाजातील इतर मान्यवर उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@