पहिल्या कसोटीत गोलंदाजांची पकड!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |



ऍडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पहिल्या कसोटीत भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले आहे. दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने ७ बाद १९१ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे ढेपाळलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला ट्रेव्हिस हेडने सावरण्याचा प्रयत्न केला. ६१ धावांवर तो दिवसाखेर नाबाद राहिला. भारताकडून रविचंद्र अश्विनने सर्वाधिक ३ बळी टिपले तर जसप्रित बुमरा व इशांत शर्माने प्रत्येकी २ बळी टिपले.

 

तत्पूर्वी, पहिल्या डावात भारताला २५० धावा करता आल्या. भारताने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात अडखळती झाली. इशांत शर्माने डावाच्या पहिल्याच षटकात ऍरॉन फिंचला त्रिफळाचीत केले. यानंतर हॅरिस आणि ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. यानंतर भारतीय गोलंदाजांनी हातातून निसटलेल्या सामन्यावर आपली पकड मजबूत केली. भेदक मारा करत ऑस्ट्रेलिया संघाला जखडून ठेवले. त्यामुळे आता पहिल्या कसोटीत रंगतदारपणा आल्याचे दिसून आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@