विकासात भारतीय शहरेच टॉपला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |


 
 
ऑक्सफर्ड इकोनॉमिकच्या अहवालातून माहिती समोर

 

नवी दिल्ली : देशवासियांसाठी आनंददायक व मुंबईकरांसाठी चिंताजनक अशी एक बातमी आहे. जीडीपीच्या बाबतीत जगातील सर्वात मोठ्या १०० शहरांमध्ये भारतातील ३ शहरांचा समावेश आहे. तर जगातील वेगाने वाढणाऱ्या १० शहरांमध्ये सर्व शहरे भारतातील आहेत. ऑक्सफर्ड इकोनॉमिकने सादर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली. धक्कादायक म्हणजे दिल्ली व मुंबई या भारतातील महत्वाच्या शहरांचा यामध्ये समावेश नाही.
 

२०१९ से २०३५ या कालखंडात जीडीपीच्या बाबतीत जगातील सर्वात मोठ्या १०० शहरात भारतातील ३ शहरे असणार आहेत. यामध्ये बंगळुरु, हैदराबाद आणि चेन्नई या शहरांचा समावेश आहे. तर जगातील वेगाने वाढणाऱ्या १० शहरांमध्ये सूरत पहिल्या स्थानावर आहे. यानंतर आग्रा व बंगळुर शहरांचा नंबर लागेल. तर हैद्राबाद शहर चौथ्या क्रमांकावर असेल. यानंतर नागपूर, तिरुपूर, राजकोट, तिरुचिरापल्ली, चेन्नई आणि विजयवाडा ही शहरेदेखील वेगवान विकास करतील असे सांगण्यात आले आहे.

 

दरम्यान, जगातील सर्वात वेगवान विकास करणाऱ्या वेगवान शहरांमध्ये नोम पेंह पहिल्या स्थानावर आहे. या अहवालामध्ये २०३५ साली लोकसंख्येच्या बाबतीत मुंबई जगातील पहिल्या दहा शहरांमध्ये असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. विकासाच्या बाबतीत ऑक्सफर्ड इकोनॉमिकची आकडेवारी दिलासादायक असली तरी, लोकसंख्यावाढीच्या बाबतीत नक्कीच चिंताजनक आकडेवारी वर्तवण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@