रा.स्व.संघातर्फे रक्तदान शिबिराद्वारे महामानवाला अभिवादन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |

45 स्वयंसेवकांचे रक्तदान


जळगाव : 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयात दरवर्षांच्या संकेतानुसार 6 रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबीर झाले. 45 बॅग संकलित झाल्या. केशवस्मृती सेवा संस्था समुहातील माधवराव गोळवलकर रक्तपेढीचे या उपक्रमात सहकार्य लाभले.
 
प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ पत्रकार विजय वाघमारे यांच्याहस्ते दिपप्रज्ज्वालन करुन शिबिराची सुरुवात झाली. बाबासाहेबांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
 
रा. स्व. संघाचे शहर संघचालक डॉ. विलास भोळे, जिल्हा कार्यवाह किशोर चौधरी, हितेश पवार, राजेश ज्ञाने, जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह विनोद कोळी, दिपकराव घाणेकर, विवेकराव जोशी आदी मान्यवरांसह व स्वयंसेवक बंधूंची उपस्थिती होती.
@@AUTHORINFO_V1@@