शहरात विविध ठिकाणी डॉ.बाबासाहेबांना अभिवादन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |


जळगाव : 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
 
 
तसेच शहरातील विविध शाळा, महाविद्यालयात कार्यक्रमांचे आयोजन होवून पंचशीलाचे वाचन करण्यात आले. दरम्यान, शहरात रॅली सुद्धा काढण्यात आली.
मू. जे. महाविद्यालय
 
मु.जे. महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रमात प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी आणि उपप्राचार्य डॉ. सुरेश तायडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
 
 
उपप्राचार्य डॉ. सुरेश तायडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वावर विचार व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रक्तविरहित धम्मक्रांती घडवून आणली. आयुष्यभर दलित, वंचित समाजासाठी काम केले. त्यांच्या कार्यामुळे हजारो वर्षे गुलामीच्या जोखडात अडकलेल्या समाजाला मुक्ती मिळाली.
 
 
मात्र सध्याच्या काळात त्यांना ठराविक चौकटीत अडकविण्याचा प्रयत्न केला जातो आहे. अशावेळी आपण खरे बाबासाहेब सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
 
 
बुद्धवंदना घेण्यात आली. या कार्यक्रमाला डॉ. चंद्रमणी लभाने, प्रा.देवेंद्र इंगळे, प्रा. संजय हिंगोणेकर, प्रा. योगेश महाले, प्रा. के.के.वळवी, प्रा. जयेश पाडवी, डॉ. लक्ष्मण वाघ, प्रा. डी.आर.वसावे, डॉ. उज्ज्वला नेहते, प्रा. प्रीती शुक्ला, प्रा. गोपीचंद धनगर, प्रा. राजीव पवार, प्रा.सुप्रिया बोदडे, प्रा. आर. आर. अत्तरदे, प्रा. अमोल बावस्कर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन पीयूष तोडकर याने केले.
 
 
आई जिजाऊ, माता रमाई, वासुमित्रा फाऊंडेशन
 
आई जिजाऊ, माता रमाई फाऊंडेशन, वासुमित्रा फाऊंडेशन यांच्यातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.
 
 
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे निरीक्षक रणजीत शिरसाठ होते तर अध्यक्ष वासु सोनवणे तथा नगरसेवक गणेश सोनवणे यांची उपस्थिती होती.
 
यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते भुषण सोनवणे, जयेश पाटील, श्रीकांत सोले, भगवान भालेराव, आनंद अहिरे, मनोज भंडारी, ईश्वर ढिवरे, सुजय सपकाळे, सागर पाटील, सचिन पाटील, निलेश सपकाळे, कृष्णा तायडे, राहुल सोले, संजय अहिरे, गजू सोनवणे आदींनी सहकार्य केले. सूत्रसंचालन ईश्वर वानखेडे यांनी तर आभार निलेश शिंपी यांनी मानले.
 
 
शासकीय तांत्रिक विद्यालय
 
येथील शासकीय तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन पंचशीलाचे वाचन करण्यात आले. पूर्णवेळ शिक्षक दिलीप बोंडे यांनी प्रतिमेस माल्यार्पण केले.
@@AUTHORINFO_V1@@