वाघूर पाणीपुरवठा योजनेतील घोटाळ्याप्रकरणी चौघांना जामीन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |

पुढील कामकाज 21 जानेवारीला


जळगाव : 
 
जळगाव तत्कालीन नगरपालिकेने राबविलेल्या वाघूर पाणीपुरवठा योजनेतील घोटाळ्याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
 
या घोटाळ्याप्रकरणी संशयित प्रदीप रायसोनी, लक्ष्मीकांत चौधरी, सदाशिव ढेकळे, तत्कालीन मुख्याधिकारी पी.डी.काळे यांना गुरुवारी न्यायालयाने 20 हजारांच्या जातमुचलक्यावर व 20 हजारांच्या रोखीवर जामीन दिला आहे. या खटल्याचे पुढील कामकाज 21 जानेवारी रोजी होणार आहे.
 
 
वाघूर घोटाळ्याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आज प्रथमवर्ग न्यायाधीश बी.डी. गोरे यांच्या न्यायालयात कामकाज झाले. या गुन्ह्याच्या खटल्यातील संशयित प्रदीप रायसोनी, लक्ष्मीकांत चौधरी, सदाशिव ढेकळे, तत्कालीन मुख्याधिकारी पी.डी.काळे हे चौघे न्यायालयात हजर होते. सिंधुताई कोल्हे यांची प्रकृती खराब असल्याने त्यांनी न्यायालयात हजर राहू शकणार नाही.
 
 
याबाबत प्रतिज्ञापत्र वकीलामार्फेत सादर केले होते. कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सरकारपक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. रंजना पाटील यांनी हा गुन्हा आर्थिक व गंभीर स्वरुपाचा असल्याचा प्रभावी युक्तीवाद करून संशयितांच्या जामीनावर तीव्र हरकत घेतली.
 
 
त्यानंतर संशयित प्रदीप रायसोनी व लक्ष्मीकांत चौधरी यांच्यावतीने ऍड. प्रकाश बी. पाटील यांनी युक्तीवादाला सुरुवात केली. त्यांनी युक्तीवादात असे म्हटले की भादवी कलम 409 या कलमाखाली जन्मठेपेची शिक्षा आहे.
 
जन्मठेपेच्या शिक्षेला फाशीची शिक्षा समांतर आहे. या न्यायालयाला शिक्षा देण्याचा व दोष निश्चितीचा अधिकार आहे. त्या तुलनेत जामीन देण्याचा देखील अधिकार आहे.
 
 
तसेच फसवणूक व अपहार एकत्रित असू शकत नाही. ते दोन्ही वेगवेगळे आहे. हा गुन्हा 20 वर्षापूर्वीचा आहे. 14 वर्षापूर्वी या गुन्हयाची तक्रार दाखल झाली आहे. व 6 वर्षानंतर हा दोषारोपपत्र दाखल झाले आहे.
 
 
तो पर्यंत पोलिसांना संशयितांच्या अटकेची गरज भासली नाही. संशयित हे संस्थानिक आहे. त्यांच्या स्थावर मालमत्ता देखील शहरातच आहे. त्यामुळे त्यांना जामीन देण्यास काहीही हरकत नसल्याचे सांगितले.
 
 
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद एकल्यानंतर न्यायालयाने संशयित प्रदीप रायसोनी, लक्ष्मीकांत चौधरी, सदाशिव ढेकळे, तत्कालीन मुख्याधिकारी पी.डी.काळे यांना न्यायालयाने 20 हजारांच्या जातमुचलक्यावर व 20 हजारांच्या रोखीवर जामीन दिला आहे. या खटल्याचे पुढील कामकाज 21 जानेवारी रोजी होणार आहे.
 
 
सरकारपक्षातर्फे ऍड. रंजना पाटील, संशयित प्रदीप रायसोनी, लक्ष्मीकांत चौधरी यांच्यातर्फे ऍड. प्रकाश पाटील, सदाशिव ढेकळे यांच्यावतीने अ‍ॅड. गोंविद तिवारी तर पी.डी.काळे यांच्यावतीने अ‍ॅड. नितीन जोशी यांनी कामकाज पाहिले.
@@AUTHORINFO_V1@@