#ExitPolls : मतदानोत्तर चाचण्यांचे संमिश्र कल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |


नवी दिल्ली : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगण आणि मिझोरम या पाच राज्यांतील मतदारांचा कौल अखेर मतपेटीत बंदिस्त झाला असून येत्या ११ डिसेंबर रोजी या पाचही राज्यांचे निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान, राजस्थान आणि तेलंगणमधील मतदान पार पडल्यानंतर शुक्रवारी पाचही राज्यांचे मतदानोत्तर कल जाहीर झाले. अपेक्षेप्रमाणे, हे कल संमिश्र असून यानुसार मध्य प्रदेश, छत्तीसगढचा कौल भाजपकडे तर राजस्थानचा काँग्रेसकडे झुकलेला राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राजस्थान आणि तेलंगण विधानसभांसाठी मतदान शुक्रवारी पार पडले. राजस्थानमध्ये सायंकाळपर्यंत सुमारे ७२ टक्के तर तेलंगणमध्ये सुमारे ६७ टक्के मतदान नोंदवण्यात आले. तसेच, यानंतर अनेक संस्थांद्वारे आपापल्या मतदानोतर चाचण्यांचे निकालदेखील जाहीर करण्यात आले. या चाचण्यांनुसार, राजस्थानमध्ये काँग्रेस, मध्य प्रदेश व छत्तीसगढमध्ये भाजप आणि तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समितीची सरशी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून मिझोरममध्ये मिझोरम नॅशनल फ्रंट बाजी मारण्याची शक्यता आहे. सध्या मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगढमध्ये भाजप, तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समिती तर मिझोरममध्ये काँग्रेस स्पष्ट बहुमतात सत्तेत आहेत.

 

मध्य प्रदेश विधानसभेच्या एकूण २३० जागांपैकी भाजप स्पष्ट बहुमताचा अर्थात ११६ चा टप्पा ओलांडेल व काँग्रेसदेखील ९० ते १०० च्या आसपास राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून काही संस्थांनी राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याचीही शक्यता वर्तवली आहे. छत्तीसगढमध्येदेखील ९० पैकी ४६ हा बहुमताचा आकडा भाजप गाठेल असा अंदाज असून अनेकांनी त्रिशंकू परिस्थिती वर्तवली आहे. राजस्थानमध्ये एकूण २०० जागा असून अनेक संस्थांनी काँग्रेसला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तेलंगणमध्ये एकूण ११९ जागांपैकी स्पष्ट बहुमताचा पल्ला यावेळी पुन्हा तेलंगण राष्ट्र समिती अर्थात टीआरएसच गाठेल, अशी दाट शक्यता असून मिझोरम काँग्रेसच्या हातून निसटून मिझोरम नॅशनल फ्रंट सर्वांत मोठा पक्ष बनण्याची शक्यता आहे. मात्र मिझोरममध्ये कोणताही एक पक्ष स्पष्ट बहुमताचा पल्ला गाठण्याची शक्यता खूपच धूसर दिसत आहे.

 

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंदिया, मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, छत्तीसगढमध्ये मुख्यमंत्री डॉ. रमणसिंग, तेलंगणमध्ये मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, मिझोराममध्ये मुख्यमंत्री लाल थनहवला यांचे नेतृत्व पणाला लागले आहे. आता प्रत्यक्षात या निवडणुकांमध्ये कोणता पक्ष बाजी मारतो, हे येत्या मंगळवारी, अर्थात दि. ११ डिसेंबर रोजीच स्पष्ट होणार आहे.

 

मतदानोत्तर चाचण्यांचा कल

१) मध्य प्रदेश (२३०)

 

भाजप

काँग्रेस

सीएनएक्स-टाइम्स नाऊ

१२६

८९

अॅक्सिस-इंडिया टुडे

१०२-१२०

१०४-१२२

जन की बात

१०८-१२८

९५-११५

न्युजएक्स-नेता

१०६

११२

सीवोटर-रिपब्लिक टीव्ही

९०-१०६

११०-१२६

२) राजस्थान (२००)

 

भाजप

काँग्रेस

सीएनएक्स-टाइम्स नाऊ

८५

१०५

अॅक्सिस-इंडिया टुडे

५५-७२

११९-१४१

जन की बात

९३

९१

न्युजएक्स-नेता

८०

११२

सीवोटर-रिपब्लिक टीव्ही

६०

१३७

३) छत्तीसगढ (९०)

 

भाजप

काँग्रेस

सीएनएक्स-टाइम्स नाऊ

४६

३५

अॅक्सिस-इंडिया टुडे

२१-३१

५५-६५

न्युजएक्स-नेता

३६-४२

४५-५१

सीवोटर-रिपब्लिक टीव्ही

३५-४३

४०-५०

४) तेलंगण (११९)

 

टीआरएस

काँग्रेस+

भाजप

सीएनएक्स-टाइम्स नाऊ

६६

३७

अॅक्सिस-इंडिया टुडे

७९-९१

२१-२३

१-३

जन की बात

५०-६५

३८-५२

४-७

न्युजएक्स-नेता

५७

४६

५) मिझोरम (४०)

 

काँग्रेस

मिझोरम नॅशनल फ्रंट

झेडपीएम

सीवोटर-रिपब्लिक

१४-१८

१६-२०

२-७

 
 
@@AUTHORINFO_V1@@