मध्य रेल्वेच्या एलएचबी कोचेससाठी भुसावळात पीओएच वर्कशॉप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |
 

 
भुसावळ, ७ डिसेंबर
नागपूर विभागातून धावणार्‍या रेल्वेगाड्यांच्या एलएचबी कोचेसच्या दुरुस्तीसाठी भुसावळात पीओएच वर्कशॉपची उभारणी केली जाणार आहे. या आशयाचा एक प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठविण्यात आला असून तो ५०७ कोटी ६४ लाख रुपये खर्चाचा आहे.
 
 
याआधी ही कार्यशाळा नागपूर येथे उभारण्यात येणार होती. पण तिथे पुरेशी जागा नसल्याने भुसावळ येथील जागेची निवड करण्यात येणार आहे. भुसावळ येथील विभागीय महाव्यवस्थापकांनी गेल्या सप्टेंबरात जागा उपलब्ध असल्याचे कळविल्याने हा प्रकल्प आता भुसावळात सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे.
 
 
या प्रकल्पाच्या विभागवार खर्च पुढीलप्रमाणे केला जाईल(कंसात खर्च कोटी रुपयांमध्ये)- बांधकाम (३०५ कोटी ८९ लाख ), यांत्रिकी (१३९ कोटी ७७ लाख ), विद्युत (४६ कोटी ४० लाख), एस ऍण्ड टी(१५ कोटी ५८ लाख). हा प्रकल्प व्यवहार्य ठरणार आहे. कारण बरेचसे पीओएच ड्यु कोचेस मुंबई/पुणे क्षेत्रातच वेगळे केले जात असतात.
@@AUTHORINFO_V1@@