श्रीरामायणात जीवन जगण्याची सर्वोत्तम शैली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |


श्रीरामकथेत भक्त किशोरदास यांचे प्रतिपादन


फैजपूर ता. यावल : 
 
श्रीरामायणात मनुष्य जीवन जगण्याची सर्वोत्तम शैली आहे. याकथा श्रवणाने संसार करून परमार्थ सहज साधता येतो.आज जागोजागी रावण दहन केले जाते,
 
मात्र प्रत्येकाने आपल्या मनातील अहंकार रुपी रावणाचे दहन केल्यास भक्ती परमार्थचा बोध जीवनात साधता येईल. , असे प्रतिपादन भक्तीकिशोरदास यांनी केले.
 
फैजपूरला आयोजित संगीतमय श्रीराम कथेत भक्ती किशोरदास यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शास्त्री विश्वप्रकाशदास यांनी केले. कथा 10 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
 
रामायणात श्रीराम व रावण दोघेही उत्तम शिवभक्त व एकाच राशींचे होते. श्रीराम हे संस्कारमय होते. रावण अहंकारमय होते विनाश कुणाचा झाला हे सर्वश्रृत आहे. रामकथा ही प्रपंचरूपी संसाराचे सूत्र असल्याचे त्यांनी सांगितले.
 
येथील शिवकॉलनीतील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिराचे नवव्या वर्धापनदिन निमित्ताने संगीतमय श्रीरामकथा सप्ताह पारायणची सुरुवात मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडी सोहळ्याने झाली.
 
व्यासपीठावर कथावक्ते खान्देशरत्न शास्त्री भक्तीकिशोदास महाराज, शास्त्री विश्वप्रकाशदास महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.स्वामी नारायण, विठ्ठल भगवान, श्री राम यांच्या तैलचित्रांना माल्यार्पण करून कथा प्रारंभ केली. सूत्रसंचालन विलास टोके यांनी केले.
@@AUTHORINFO_V1@@