शेंदुर्णीत भाजपा, राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |

नगरपंचायत निवडणूकीत वाढली चुरस, सर्वच राजकीय पक्षाचा विकासाचा दावा


 
शेंदुर्णी ता. जामनेर : 
 
शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीसाठी 9 रोजी मतदान होत असून प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे.
 
नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार असले तरी भाजपा, राष्ट्रवादी, मनसे यांच्यात ील लढत लक्षवेधी मानली आहे. त्यामुळे ही पहिलीच निवडणूक भाजपा, राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे भाजपा, राष्ट्रवादीची खरी अग्निपरीक्षा आहे.
 
 
प्रचारात राजकीय पक्षांकडून विकासाचे दावे प्रतिदावे केले जात आहे. मोदी, फडणवीस आणि गिरीशभाऊ यांच्या नेतृत्त्वासह अन्य अनेक प्रश्न व समस्या लक्षात घेता मतदारराजा कोणाला कौल देतो, याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
 
 
नगराध्यक्षपदाचा आणि नगरसेवकाच्या खुर्चीचा दावेदार मतदार रविवारी निश्चित करणार आहेत.नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठी भेटी घेतल्या आहेत.
 
सध्या गल्लीबोळात निवडणुकीच्या चर्चा रंगत आहेत. शुक्रवारी 7 रोजी प्रचारांचा शेवटचा दिवस असल्याने जाहीर सभा व प्रचाराचा समारोप होणार आहे.
 
भाजपाकडून नगराध्यक्षपदासाठी विजया अमृत खलसे मैदानात आहेत. त्या शेंदुर्णी ग्रामपंचायतीच्या पूर्वाश्रमीच्या सरपंच... त्यांनी 20 वर्ष ग्रामपंचायत सदस्यपद भूषविले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून क्षितीजा प्रवीण गरुड रिंगणात आहेत.
 
 
त्या उच्च विद्याविभूषित आहेत. तसेच मनसेकडून सरिता प्रकाश चौधरी नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असून शिवसेनेतर्फे मनिषा बारी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी लढवित आहेत.
शेंदुर्णीचा कायापालट करणार
 
राज्याचा व केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी आणून शेंदुर्णी गावाचा विकासाचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प आहे. गावाच्या विकास करून जनतेला सोयी, सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचा विश्वास भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विजया खलसे यांनी व्यक्त केला आहे.
गावांची सेवा करणार
 
शेंदुर्णी गावाची सेवा करण्याचा मानस असून गोरगरीब जनतेसाठी काम करणार असून योजनाच्या माध्यमातून
न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमदेवार क्षितीजा गरुड यांनी व्यक्त केला.

सर्वसामान्याचे प्रश्न सोडविणार
 
सर्वसामान्यांचे विविध प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा मानस असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशिल असणार आहे. या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करणार आहे.
 
ज्या उपेक्षितांकडे कुणी लक्ष देत नाही. त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याचे मनसेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सरिता चौधरी यांनी सागितले.
@@AUTHORINFO_V1@@