‘इचिमुकू क्लाऊड’ निर्देशक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |



मागील लेखात नमूद केल्याप्रमाणे या चार्ट प्रकारांमध्ये लाईन चार्ट, बार चार्ट, कॅन्डलस्टिक चार्ट, पॉईंट अॅण्ड फिगर चार्ट, हेकिनअसी, रेन्को चार्ट्स, इचिमुकू क्लाऊड, कागी चार्ट्स इत्यादी चार्ट समाविष्ट आहेत. पैकी आपण लाईन चार्ट, बार चार्ट, कॅन्डलस्टिक चार्ट, पॉइंट अॅण्ड फिगर चार्ट, हेकिनअसी आणि कागी चार्ट्स यांबद्दल माहिती घेतली. आता आज ‘इचिमुकू क्लाऊड’ची माहिती घेऊया.


‘इचिमुकू किंको हाय चार्ट’ हे एक तांत्रिक निर्देशक आहे आणि हा फ्युचर्स आणि इक्विटी मार्केट्समधील व्यापारांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. अधिक डेटा पॉईंट दर्शवित असल्यामुळे ‘इचिमुकू’ अधिक स्पष्ट चित्र प्रदर्शित करतात. याच कारणामुळे हा प्रकार अधिक विश्वासू आणि लोकप्रिय आहे. ‘इचिमुकू’मध्ये तीन संकेतकांना एकाच चार्टमध्ये एकत्र केले जाते, ज्यामुळे विक्रेता सर्वात योग्य निर्णय घेतो. या विभागात, ‘इचिमुकू’ कसे कार्य करते आणि आपल्या व्यवसायात निर्देशक म्हणून ते कसे वापरावे ते आता बघूया. समोरील चित्र हे आपण उदाहरण म्हणून घेऊया आणि यातील महत्त्वाच्या घटकांशी तोंडओळख आणि त्याचा अर्थ आणि परिमाणे समजून घेऊया. ‘इचिमुकू चार्ट’चे घटक खालीलप्रमाणे गणले जातात :

 

. टेकान-सेन किंवा conversion line (लाल) - (सर्वोच्च उच्चतम + सर्वात कमी) / २, गेल्या सात ते आठ कालावधीत मोजली.

 

. किजुन-सेन, किंवा बेस लाईन (मरून) - (उच्चतम + सर्वात कमी) / २, गेल्या २२ कालखंडात मोजली.

 

. चिको स्पॅन किंवा लॅगिंग स्पॅन (गुलाबी) - सर्वात चालू बंद किंमत मागील २२ कालखंड (वैकल्पिक)

 

. सेन्कोऊ स्पॅन ए (ग्रीन) - (टेनकन सेन + किजुन सेन) / २, पुढे २६ कालखंड प्लॉट केले.

 

. सेनकॉ स्पॅन बी (निळा) - (उच्चतम उच्चतम + सर्वात कमी) / २, गेल्या ४४ कालखंडात मोजली. पुढे २२ कालखंड प्लॉट करा.

 

परत एकदा सांगतो, हे सगळे आपल्याला फक्त माहीत असावे म्हणून सांगतो आहे. आपण हे सारे पाठ वगैरे करायच्या फंदात पडू नका. इंडिकेटर नक्की कसे बनतात, हे आपल्याला माहीत हवे. मात्र, वेळ मिळाल्यावर वा थोड्या थोड्या अंतराने त्याची उजळणी व्हावी एवढेच. आता आपल्याकडे रंगीबेरंगी ओळी आणि विचित्र ढगांनी भरलेला गोंधळलेला चार्ट आहे, आपल्याला ते कसे समजून घ्यावे, हे माहीत असणे आवश्यक आहे. इचिमुकू चार्टचा वापर अनेक गोष्टी निर्धारित करण्यासाठी केला जाऊ शकतो. खालील सिग्नलची यादी आणि आपण त्यांना कसे शोधू शकता, हे खाली दिले आहे.

 

) मजबूत सिग्नल : तेंकन-सेन किजुन सेनच्यावरून खाली उतरल्यावर एक मजबूत खरेदी सिग्नल येतो. एक उलट विक्री सिग्नल तेव्हा होते जेव्हा उलट होते. सिग्नल कुमोच्या वर असणे आवश्यक आहे.

 

) सामान्य सिग्नल : तेनकन-सेन किजुन सेनच्या वरून खाली उतरल्यावर सामान्य खरेदी सिग्नल येते. एक सामान्य विक्री सिग्नल येते तेव्हा उलट होते. सिग्नल कुमोच्या आत असणे आवश्यक आहे.

 

) कमकुवत सिग्नल : तेंकन-सेन किजुन सेनच्या वरून खाली उतरल्यावर एक कमकुवत खरेदी सिग्नल येते. उलट असताना एक कमकुवत विक्री सिग्नल येते. सिग्नल कुमोच्या खाली असणे आवश्यक आहे.

 

) एकूणच शक्ती : Chikou Span वर्तमान किमतीच्या खाली असेल तर मंदी दर्शविली जाते आणि उहळर्ज्ञेी डरिप वर्तमान किमतीच्या वर असेल तर तेजी दर्शविली जाते.

 

ट्रेंड

 

कुमाच्या सध्याच्या किमतीची किंमत कोठे आहे, हे पाहून ट्रेंड निश्चित केले जाऊ शकतात. किंमत कुमाच्या खाली राहिल्यास, खालीची प्रवृत्ती (मंदी) आहे; किंमत कुमाच्या वर राहिल्यास, एक वरचा कल (उत्साही) असतो. इचिमुकू चार्ट्स आपल्याला, तेजी/मंदी, ट्रेंड्स, समर्थन / प्रतिकार पातळी आणि अगदी खोटे ब्रेकआऊट्सचा अंदाज देण्याची एक दुर्मीळ संधी देतात. हे वापरणे सोपे असल्यामुळे आणि अंदाज अचूक येत असल्यामुळे अधिक लोकप्रिय आहे. धोकादायक चापारी सौदे आपल्याकडून होऊ नयेत म्हणून आणि सुरक्षित नफा मिळविण्यासाठी हा चार्ट अभ्यासणे अतिशय महत्त्वाचे आहे. मित्रहो, आपण याबरोबरच ‘चार्ट’ नावाचा अभ्यास येथे संपवत आहोत. आपला क्लिष्ट अभ्यास आता संपला. आता पुढील आठवड्यात नवीन काहीतरी. जाता जाता एवढेचे सांगावेसे वाटते की, शेअर मार्केट ही एक अलिबाबाची गुहा आहे आणि येथे अनेक संधी असतात. तुमचे कष्ट, अभ्यास, निर्णयक्षमता यांचा कस येथे लागतो. चिकाटी आणि संयम यांचा येथे अनेकवेळा अंत बघितला जातो. हे एक अतिशय अल्प भांडवलात, उत्तम परतावा देणारे साधन आहे, मात्र त्यासाठी जिद्द आणि कष्ट अपेक्षित असतात. सततचा अभ्यास, सराव, निरीक्षण, अंदाज, paper trade आणि सर्व काही शिकायची वृत्ती नक्कीच तुमच्या आयुष्यात एक चांगला फरक आणेल, यात वाद नाही. आजच्या लेखाबद्दल काही शंका असेल तर त्या सोडवण्यात आम्हाला आनंदच आहे आणि नेहमीचा आपुलकीचा निरोप, आम्ही या प्रवासात आपल्याबरोबरच आहोत, याची खात्री बाळगा.

 

- विजय घांग्रेकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@