नितीन गडकरींना कार्यक्रमात आली भोवळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |


 


अहमदनगर : केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नितीन गडकरी यांना मंचावरच भोवळ आली. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. ते शुक्रवारी राहुरी कृषी विद्यापीठातील पदवीदान समारंभानिमित्त अहमदनगरमध्ये आले होते. शुगर कमी झाल्याने त्यांना चक्कर आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

राहुरी कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला नितीन गडकरी आले होते. त्यांचे भाषण संपल्यानंतर राष्ट्रगीत सुरू झाले. त्याचवेळी त्यांना भोवळ आली. राज्यपालांनी त्यांना सावरले. त्यानंतर तेथील पस्थितांनी गडकरींना तातडीने रुग्णालयात हलवले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. प्राथमिक उपचारानंतर ते स्वतःच चालत गेले आणि वाहनात बसले. त्यांना पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, नितीन गडकरी यांनी ट्विट करून प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली. तसेच हितचिंतकांचे आभार मानले.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@