ठाणे स्थानकामध्ये 'एटीव्हीएम' बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |



ठाणे : ठाणे स्थानकामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी एटीव्हीएम बसवण्यात आले होते. पण, सध्या स्थानकातील ७ एटीव्हीएम मशीन बंद पडल्या आहेत. तर उर्वरित २३ मशीनमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने प्रवाशांना मात्र रांगेमध्ये उभे राहून तिकीट काढावे लागत आहे. याची वारंवार तक्रारी केल्यानंतरही या त्रुटी दूर होत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

 

ठाणे रेल्वे स्थानकात पश्चिमेकडे लावलेली तीन आणि पूर्वेकडील तिकीट खिडक्यांना लगतची चार यंत्रे महिनाभर बंद आहेत. मध्य रेल्वेने मध्यंतरी जाहीर केलेल्या एका अहवालानुसार ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज सहा लाख प्रवाशांची ये-जा सुरू असते. गर्दीच्या स्थानकांतील प्रवाशांना तिकिटांसाठी ताटकळावे लागू नये यासाठी रेल्वेने एटीव्हीएम सुविधा दिली आहे.

 

एटीव्हीएमचा वापर करून स्मार्टकार्डद्वारे तिकीट काढणाऱ्यांचे प्रमाण वाढावे आणि तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी व्हाव्यात, यासाठी रेल्वेकडून वारंवार जनजागृती केली जाते, मात्र प्रत्यक्षात यंत्रेच बंद असल्यामुळे स्मार्टकार्डचा फारसा वापरच होत नाही, अशी प्रवाशांची तक्रार आहे. यूटीएस अ‍ॅपवरून तिकीट काढणे अनेकांना जमत नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@