अमळनेरला विकास कामांसाठी 2 कोटींचा निधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |

आ.शिरीष चौधरी यांची माहिती; विविध समाजांसाठी सभागृह, पत्रकार भवन, बगिच्याचा समावेश



 
अमळनेर : 
 
शहरात विविध 13 महत्वपूर्ण विकासकामांसाठी 2 कोटीचा निधी मंजूर झाला असून या निधीतून विविध समाजांसाठी सामाजिक सभागृह,पत्रकार बांधवांसाठी भवन,श हरात मुख्य रस्त्यावर प्रवेशद्वार तसेच अंबरीश महाराज टेकडीजवळ बगीचा व जॉगिंग ट्रॅक आदींसह इतर विकासकामांचा समावेश असल्याची माहिती आ.शिरीष चौधरी यांनी दिली.
 
यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव विवेक कुंभार यांचे विकास कामांचे विवरण पत्र दि 4 डिसबेर रोजी प्राप्त झाले असून ही सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने होणार असल्याचे आ.चौधरी यांनी सांगितले.
 
या विकास कामांच्या माध्यमातून आ.चौधरी यांनी विविध समाजांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे,या समाजांसाठी स्वतःचे हक्काचे भवन उभे राहणार आहे.
 
तसेच पत्रकार भवनाची अनेक वर्षांपासूनची अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने होत असलेली पत्रकार बांधवांची मागणी पूर्णत्वास आणली आहे.याशिवाय शहराच्या मुख्य रस्त्यावरील प्रवेश द्वारामुळे शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे
 
.तसेच पर्यटनासह व्यायाम करणार्‍यांसाठी केंद्रबिंदू ठरलेल्या अंबरीश महाराज टेकडीजवळ आकर्षक बगीचा व जॉगिंग ट्रॅक विकसित केला जाणार असल्याने टेकडीचे आकर्षण अधिक वाढून निसर्ग प्रेमींची मागणी पूर्णत्वास येणार आहे.
 
दरम्यान या विकास कामांसाठी आ.चौधरी यांनी शासन दरबारी प्रस्ताव सादर करून सतत पाठपुरावा केला होता,अनेक कामांची मागणी त्यांनी केली असताना तूर्तास 13 विकास कामांसाठी 2 कोटी निधी मंजूर झाला असून अजून मागणी केलेल्या इतर विकासकामांना लवकरच मंजुरी मिळेल असा विश्वास आ.चौधरी यांनी व्यक्त करत सदर मंजुरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहेत.
 
तर पत्रकार भवनाची मागणी पूर्णत्वास आणल्याबद्दल अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत,सचिव चंद्रकांत पाटील,सर्व सदस्य व जेष्ठ पत्रकार तसेच समाज मंदिर दिल्याबद्दल राजपूत समाज,भोई समाज,सुतार समाज,जैन समाज,मुस्लिम समाज,ब्राह्मण समाज व टेकडी वरील निसर्ग प्रेमींनी आ.चौधरी यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.

अशी होणार विकास कामे
 
अमळनेर शहरात पत्रकार भवन बांधणे 10 लाख, जापानजीन जवळ शादीखाना बांधणे 30 लाख, पैलाड येथे गट क्र 144/अ जवळभोईसमाज वस्तीत सभागृह करणे 20 लाख, अंबरीषी टेकडी येथे बगीचा जॉगिंग ट्रॅक विकसित करणे 10 लाख एल आय सी कॉलनी गट क्र 1510/2 जवळ निरगुंजी महाराज परिसर येथे जॉगिंग ट्रॅक बांधणे 20 लाख, सुतार समाजासाठी विश्वकर्मा मंदिर गट क्र 1748 जवळ ढेकू रोड येथे सभागृह बांधणे 10 लाख, एल आय सी कॉलनी गट क्र 1509 जवळ, येथील मोकळ्या जागेत सभागृह बांधणे 10 लाख, रामवाडी येथे गट क्र 3709 जवळ सभागृह बांधणे 10 लाख, राजपूत समाजासाठी गट क्र 1810 जवळ सभागृह बांधणे 10 लाख,10 ख्वाजा नगर गट क्र 3237 जवळ येथे सभागृह बांधणे 10 लाख, ब्राम्हण समाजासाठी टी.पी क्र 38/9 अ /2 जवळ सभागृह बांधणे 10 लाख, जैन समाजासाठी सि.स.न.3221मधील साइड क्र 32 जवळ सामाजिक सभागृह बांधणे 10 लाख, शहरातील मुख्य रस्त्यावर प्रवेशद्वार उभारणे 40 लाख.आदी कामांचा समावेश आहे.
@@AUTHORINFO_V1@@