‘पांढर्‍या भुवईचा बुलबुल’ची जळगावात प्रथमच नोंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |

लाल डोक्याच्या ससाण्याचे सात वर्षानंतर पुन्हा दर्शन


 
जळगाव : 
 
जळगाव शहर परिसरात ‘लालबुड्या बुलबुल (Red-vented Bulbul) सर्वत्र आणि बारा महिने मोठ्या संख्येने आढळतात.पण बुलबुल कुळातील पांढर्‍या भुवईचा बुलबुल (White-browed Bulbul- शास्त्रीय नाव Pyconotus luteolus) ही जात दक्षिण भारतात व प्रामुख्याने पश्चिम घाटात आढळ असणारी आहे.
 
2010 पासून आतापर्यंतच्या निरीक्षणात जळगावातील निमखेडी रोड परिसरात ही पहिल्यांदा नोंद झाली, असे पक्षिमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी सांगितले.
 
 
ही जात ‘खर बुलबुल किंवा सितभ्रू बुलबुल या नावानंही ओळखली जाते. त्याचा रंग फिकट ऑलिव्ह हिरवा असून त्याला पांढरी भुवई असते. वड-पिंपळाचे फळ, मध मुख्य अन्न असून वृक्षबीज प्रसाराच्या कामात मोलाचा वाटा असतो.
 
लाल डोक्याचा ससाणा / तुरमती ( Red-headed Falcon  Red-necked Falcon- किंवा Falco chicquera) ससाणा कुटुंबातील ही शिकारी जात आहे. याचा भाऊबंद आफ्रिकेत आढळतो. भारतात ही जात विखुरलेली आणि दुर्मीळ आहे.
 
 
2011 च्या नोव्हेंबरमध्ये याची ममुराबाद परिसरात नोंद घेतली होती. इतक्या वर्षानंतर डिसेंबर 2018 म्हणजे सात वर्षांनतर या ससाण्याचे पुन्हा दर्शन झाले आहे. याची मादी ‘तुरमती’ या नावाने आणि नर हा चटवा या नावाने ओळखला जातो.
 
नर-मादी दिसायला सारखे असून मादी नरापेक्षा आकाराने मोठी असते. याचा रंग फिकट निळसर करडा असून अंतर भागावर आडव्या आर्‍या असतात. हुकसारखी अणकुचीदार चोच असते. डोके आणि मान तपकिरी लाल असते.
 
 
सकाळ-संध्याकाळ ही यांची शिकारीची वेळ असते. वटवाघुळ, छोटे पक्षी, खारी, उंदीर आणि सरडे यांची टेहळणी करून नर, मादी दोघे मिळून शिकार करणे ही यांची पद्धत आहे. जळगावात नोंद झालेल्या पक्ष्यांच्या संख्येत नवीन एक जात समाविष्ट झाली आहे.
@@AUTHORINFO_V1@@