#ArmedForcesFlagDay केंद्रीय सैनिक मंडळाने घेतली पंतप्रधानांची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |

 

नवी दिल्ली : भारतीय सशस्त्र सेना झेंडा दिवस (Indian armed forces flag day) या निमित्ताने केंद्रीय सैनिक मंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी सशस्त्र सेना दलातर्फे सेना दलाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छाही दिल्या.
 

भारतीय सेनेच्या अफाट आणि अद्वितीय कार्य शौर्याबद्दल सद्भावना व्यक्त करण्यासाठी डिसेंबर हा भारतीय सशस्त्र सेना झेंडा दिन म्हणून साजरा केला जातो. देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर भारतीय सैनिकांसाठी त्यांच्या परिवाराच्या कल्याणासाठी उपाययोजना करावी या हेतून २८ ऑगस्ट १९४९ रोजी एक समितीची स्थापना करण्यात आली. समितीने दिलेल्या अहवालानुसार, डिसेंबर रोजी प्रत्येक वर्षी भारतीय सशस्त्र सेना झेंडा दिवस साजरा ठरवण्यात आले.

 
 
 

देशसेवेत असणाऱ्या सैनिकांपैकी सुमारे ५० ते ६० जाहीर सैनिक दर वर्षी निवृत्त होतात. अनेकजण युद्धात किंवा सैनिकी कारवायांमध्ये जखमी होतात. काहीजणांना अपंगत्व येते. सीमेवर लढताना देशासाठी प्राणांची बाजी लावून हुतात्मा होतात. त्यांच्या शौर्याच्या स्मरणार्थ भारतीय सशस्त्र सेना झेंडा दि आपल्या देशातील शूरवीर सैनिकांच्या स्तुतीसाठी, शहीद वीरांच्या श्रद्धांजलीसाठी, आठवणीसाठी आणि अपंग सैनिक शहीद सैनिकांच्या परिवाराला देणगीच्या स्वरूपात मदतपूर्वक हात देण्यासाठी ध्वजदिन साजरा केला जातो.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@