उद्या गोव्यात वार्षिक स्टार्टअप परिषद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2018
Total Views |

 
 
 
नवी दिल्ली : वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत औद्योगिक धोरण प्रोत्साहन खात्याने गोव्यात उद्या शुक्रवार, ७ डिसेंबर रोजीवार्षिक स्टार्ट अप इंडिया व्हेंचर कॅपिटल परिषद २०१८चे आयोजन केले आहे.
 

भारतातल्या कल्पकतेसाठी जागतिक भांडवलाला चालनाअशी यंदाची संकल्पना आहे. भारतीय स्टार्टअप्सना जगभरातील संधींचे प्रदर्शन या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. देशात जास्तीत जास्त जागतिक भांडवल आकर्षित करणे, हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे. देशातल्या स्टार्ट अपशी संबंधित बाबींना अधिक चालना मिळावी या दृष्टीने सरकार आणि अनुभवी व्हेंचर कॅपिटल फंड व्यवस्थापक यांच्यात चर्चा होण्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरणार आहे.

 

दीडशेपेक्षा जास्त प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होतील. सरकारी अधिकारी, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्टार्टअप, जागतिक निधी व्यवस्थापक भारतातल्या उद्योग जगत प्रतिनिधींचा यात समावेश असणार आहे. अमेरिका, चीन, जपान, हाँगकाँग, सिंगापूर या देशातले निधी व्यवस्थापक या परिषदेला हजर राहणार आहेत.

 

देशात १४ हजार स्टार्टअप्स

 

देशात एकूण १४ हजार मान्यताप्राप्त स्टार्टअप्स असून भारत हा मोठा स्टार्ट अप पाया असणारा जगातला तिसरा देश आहे. या स्टार्ट अपमधून या वर्षात ८९ हजारपेक्षा जास्त रोजगार निर्माण झाले असून मान्यताप्राप्त स्टार्ट अप मधून एकूण १ लाख ४१ हजार ७७५ रोजगारांची निर्मिती झाली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@