सेन्सक्स पाचशे अंशांनी गडगडला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2018
Total Views |
 
 

मुंबई : ओपेकमधील देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचा विचार, अमेरिका-चीनमध्ये व्यापारयुद्ध निवळल्यानंतरही सुरू असलेली धुसफूस आणि फिन्चने विकासदरात केलेली कपात याचा एकत्रित परिणाम गुरुवारी शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकामध्ये घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५२७.२८ अंशांच्या घसरणीसह ३५ हजार ३१२.१३ रुपयांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १८१.७५ अंशानी घसरून १० हजार ६०१.१५ वर बंद झाला.

 

इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्समध्ये सर्वाधिक ५.५४ घसरण झाली. मारूती सुझूकीमध्ये ४.५६ टक्के, टेक महिंद्रमध्ये ४.३९ टक्के, बजाज फिनसर्वमध्ये ४ टक्के घसरण नोंदवण्यात आली. दिवसअखेर सर्वच क्षेत्रातील शेअर घसरले. ऑटो आणि आयटी क्षेत्रात विक्रीचा सपाटा सुरू होता. रिलायन्सचा शेअर ३.१३ टक्क्यांनी घसरुन १११९.०५ रुपयांवर बंद झाला.

 

सकाळच्या सत्रात सेन्सेक्स तिनशे अंशांनी घसरला. निफ्टीही १० हजार ७०० अंशांनी घसरला. जागतिक पत मानांकन संस्था फिन्चने भारताचा अंदाजित विकासदर . टक्क्यांऐवजी . टक्के केल्यानंतर त्याचे पडसाद बाजारावर उमटले. सन फार्मा वगळता सर्व ब्लूचिप शेअरमध्ये घसरण दिसून आली. यात हिंदूस्थान युनिलिवर, आयटीसी, टीसीएस, इन्फोसिस कोटक महिंद्रा, मारुति सुझुकी, आयसीआयसीआय बॅंक आदी शेअर घसरले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@