अखेरच्या श्वासापर्यंत मी गात राहेन : लता मंगेशकर

    06-Dec-2018
Total Views |



 
 
 
मुंबई : भारताची गानसम्राज्ञी लता मंगेशकर या संगीत क्षेत्रातून निवृत्त होत असल्याच्या चर्चांना काही दिवसांपूर्वी उधाण आले होते. अनेक संगीतप्रेमींनी याविषयी खंत व्यक्त केली होती. लतादीदींनी सोशल मीडियावर ‘आता विसाव्याचे क्षण’ हे गाणे पोस्ट केले होते. या गाण्याचा संबंध लतादीदींच्या गायन क्षेत्रातील निवृत्तीशी जोडण्यात आला होता. आता स्वत: लतादीदींनी याबाबत वक्त्य करून या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ही निव्वळ अफवा असल्याचे लतादीदींनी म्हटले आहे.
 

माझ्या निवृततीची अफवा कुठून आणि कशी पसरली हे मला माहित नाही, कोणत्यातरी रिकामटेकड्या मूर्ख व्यक्तीचे हे काम असावे. असे लतादीदी याबाबत म्हणाल्या. अचानक दोन दिवसांपासून त्यांना निवृत्तीसंदर्भातील फोन आणि संदेश येण्यास सुरुवात झाली. असे त्यांनी सांगितले. ‘आता विसाव्याचे क्षण’ हे गाणे लतादीदींनी पाच वर्षांपूर्वी गायले होते. या गाण्याचा संबंध थेट त्यांच्या निवृत्तीशी लावण्यात आला असल्याचे लतादीदी म्हणाल्या. निवृत्ती घेण्याचा विचार मी केलेला नाही. माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी गात राहेन”. असे लतादीदींनी स्पष्ट केले. एका वृत्त्तसंस्थेला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी ही अफवा फेटाळून लावली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
अग्रलेख
जरुर वाचा
रविंद्रदादा चव्हाण : गौरव कार्यकर्त्याचा, विश्वास नेतृत्वाचा!

रविंद्रदादा चव्हाण : गौरव कार्यकर्त्याचा, विश्वास नेतृत्वाचा!

भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावर हा अभिनंदनपर लेख लिहिताना अत्यंत आनंद होत आहे. ठाणे जिल्ह्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर भाजपमधून अनेक चांगले, संवेदनशील आणि तितकेच कार्यक्षम नेते दिले. त्यामध्ये रामभाऊ कापसे, जगन्नाथ पाटील, डॉ. अशोकराव मोडक अशी काही नावे सहज डोळ्यासमोर येतात. या सर्वांनी पक्षविस्तार केला, पक्षाची पाळेमुळे समाजामध्ये घट्ट केली आणि भारतीय जनता पक्षाची विचारधारा समाजातील सर्व स्तरांमध्ये रुजवली. परिणामी, अनेक लोक पक्षाशी जोडले गेले. याच पंक्तीमध्ये आता डोंबिवलीचे..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121