दहशतवादी मुसा पंजाबमध्ये लपल्याचा संशय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2018
Total Views |
 

नवी दिल्ली : काश्मिरी आतंकवादी झाकीर मुसा हा पंजाबमध्ये असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. यानंतर भटींडा आणि फिरोजपुर शहरांमध्ये हाय अलर्ट जाहीर केला आहे. सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आतंकवादी मुसमध्ये शिखांच्या पेहेरावात असू शकतो.

 

अंसर गजवत-उल-हिंद या आतंकवादी संघटनेचा तो प्रमुख आहे. आतंरराष्ट्रीय आतंकवादाशी त्याचे संबंध आहेत. ही माहीती उघडकीस आल्यानंतर लष्कराने पंजाब पोलीस आणि अन्य सुरक्षा दलाच्या जवानांना या भागात तैनात राहण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारपासून येथे कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

 

नागरीकांना जागृत करण्यासाठी या भागात सुरक्षा दलांनी पोस्टर लावले आहेत. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये मुसा गुरुदासपूर आणि अमृतसरच्या सीमाभागात लपला असल्याची शक्यता व्यक्त केली होती. काश्मिरी घाटांमध्ये अल-कायदा सेल, गजवत-उल-हिंद प्रमुख म्हणून मुसाची ओळख नागरिकांमध्ये आहे.

 

काही दिवसांपूर्वी अमृतसरमध्ये निरंकारी सत्संग भवनात झालेल्या हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू झाला होता. तर १५ जखमी झाले होते. पोलीसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केली होती. आरोपींपैकी काहीजण खलिस्तान समर्थक असल्याचा दावा पोलीसांनी केला आहे. दरम्यान पंजाब पोलीसांनी या प्रकरणी कोणतिही माहीती जाहीर केलेली नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@