मिशेलला वाचवण्यासाठी कॉंग्रेस सरसावली : संबित पात्रा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2018
Total Views |

नवी दिल्ली : भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर हल्ला चढवला आहे. ख्रिश्चियन मिशेलचे भारतात प्रत्यार्पण केल्यानंतर गांधी कुटूंबियांची झोप उडाली असल्याचे ते म्हणाले. मिशेलला वाचवण्यासाठी आता कॉंग्रेसने वकीलांची फौज उभी केली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. कॉंग्रेसचा खरा चेहेरा आता समोर येणार असल्याचेही ते म्हणाले.

 

पात्रा म्हणाले, ख्रिश्चियन मिशेल यांचे वकील कॉंग्रेसशी संबंधित आहेत. अल्जो जोसेफ आणि मिशेलचे दोन्ही वकील विष्णु शंकर हे केरळच्या कॉंग्रेस नेत्यांचे पुत्र तर श्रीराम परक्क्ट जे कॉंग्रेसचे सदस्य आहेत. या तिघांनीही कॉंग्रेसचे नेते आणि वकील कपिल सिब्बल व सलमान खुर्शीद यांच्या अंतर्गत काम केल्याचेही पात्रा यांनी सांगितले.

 
 

मिशेलला कोठडीची गरज नसल्याचे त्यांचे वकील सांगत आहेत. त्यामुळे कॉंग्रेस का हात मिशेल के बचाव के साथ असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान रात्री उशीरा ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणी मिशेलचे वकीलपत्र घेतल्यानंतर एस. के. जोसेफ यांची कॉंग्रेसच्या लीगल सेल प्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर त्याला कॉंग्रेसमधूनही बडतर्फ करण्यात आले.

 

दरम्यान, ऑगस्टा वेस्ट लॅण्ड प्रकरणात प्रत्यार्पण झालेला दलाल ख्रिश्चियन मिशेल याने २२५ कोटी रक्कम ही सल्ला देण्यासाठी घेतल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात मला गोवले गेले असल्याचेही त्याने चौकशीदरम्यान म्हटले आहे. संरक्षण मंत्रालयाकडून पैसे घेतले नसल्याचे त्याने म्हटले आहे. ऑगस्टा वेस्ट लॅण्डकडून सल्लागार म्हणून रक्कम घेतल्याचे त्याने म्हटले आहे.

 
  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@