विमा नसलेल्यांनाही वैद्यकीय सुविधांचा लाभ देणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2018
Total Views |


 

नवी दिल्ली : विमा न काढलेल्या व्यक्तींना ईएसआयसीच्या कमी उपयोगात असलेल्या रुग्णालयात वैद्यकीय सुविधांचा लाभ देणार. केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली ईएसआयसी अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

यासाठी बाह्यरुग्ण विभागाकरिता १० रुपये हा अनुदानित दर, रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांसाठी सीजीएचएस पॅकेजच्या २५ टक्के रक्कम द्यावी लागेल. या निर्णयामुळे सामान्य जनतेला अल्प दरात दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होईल. त्याचबरोबर रुग्णालय संसाधनांचा जनतेसाठी पूर्णत: उपयोग होईल. या बैठकीत महामंडळाच्या वैद्यकीय सुविधा प्रदान करणाऱ्या यंत्रणेत अधिक सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@