‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’चा ट्रेलर रिलीज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2018
Total Views |


 


मुंबई : 'उरी' चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर लॉन्च झाला आहे. भारतीय लष्कराच्या उरी येथील कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून सर्जिकल स्ट्राईक केले होते. यावर उरी द सर्जिकल स्ट्राईकहा चित्रपट आधारित आहे. आदित्य धार याने उरी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून विकी कौशल या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच यामी गौतम, परेश रावल, कीर्ती कुल्हारी आणि मोहित रैना यांच्या यामध्ये महत्वाच्या भूमिका आहेत.

 

उरी येथील कॅम्पवर हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने अवघ्या ११ दिवसातच पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून अनेक दहशतवाद्यांची तळे उद्धवस्त केली होती. तसेच शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यामुळे या अकरा दिवसात नेमकं काय झालं? यावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या टीजरनंतर आज ट्रेलर रिलीज करण्यात आला. ये नया हिंदुस्तान है, ये हिंदुस्तान घर मे घुसेगा भी और मारेगा भी', ‘ये हिंदुस्तान अब चुप नहीं बैठेगा’, असे अंगावर रोमांच उभे करणारे अनेक संवाद या ट्रेलरमध्ये आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. ११ जानेवारी रोजी हा चित्रपट सर्वत्र रिलीज होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@