शेतमाल तारण योजनेंतर्गत शेतकर्‍यांना कर्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2018
Total Views |

 
चाळीसगाव : 
 
कृषी उत्पन्न बाजार समितीने कृषी पणन मंडळ पुणे यांच्या योजनेनुसार 3 रोजी विजयकुमार कलंत्री यांनी वखार महामंडळाकडे आपला शेतमाल ठेवलेला आहे.
 
वखार महामंडळाच्या पावतीवर चाळीसगाव कृषी बाजार समितीने त्यांना शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत त्यांच्या मागणीनुसार 50 हजार रुपयांचा धनादेश त्यांना सभापती रवींद्र पाटील, उपसभापती महेंद्र पाटील, माजी सभापती व संचालक रोहिदास पाटील, ज्येष्ठ संचालक प्रदीप देशमुख, कल्याणराव पाटील, धर्मा काळे, जितेंद्र वाणी, प्रकाश पाटील, बळवंतराव वाबळे व सर्व संचालक तसेच बाजार समितीचे प्रभारी सचिव अशोक पाटील यांच्या उपस्थितीत धनादेश देण्यात आला.
 
वखार मंडळाचे जे भाडे असेल ते बाजार समिती भरेल, असे बाजार समितीचे सभापती रवींद्र पाटील यांनी सांगितले आहे. तसेच या योजनेचा सर्वांनी मिळून लाभ घ्यावा तसेच या योजनेची संपूर्ण माहिती बाजार समितीच्या कार्यालयात मिळेल, असे बाजार समितीचे प्रभारी सचिव अशोक पाटील यांनी पत्रकान्वये कळविले
आहे.
@@AUTHORINFO_V1@@