ख्रिश्चियनला पाच दिवसांची सीबीआय कोठडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2018
Total Views |


पतियाळा : ऑगस्टा वेस्ट लॅण्ड प्रकरणाची सुनावणीची प्रक्रिया सुरू झाली. बुधवारी पतियाला हाऊस न्यायालयात या प्रकरणाचे विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी ख्रिश्चियन मिशेलशी चर्चा केली. न्यायालयाने ख्रिश्चियनला पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.  

 

ऑगस्टा-वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर करारातील प्रमुख दलाल ख्रिश्चियन मायकलचे मंगळवारी रात्री दुबईहून प्रत्याप्रण करण्यात आले आहे. यावरुन कॉंग्रेस आणि अन्य तत्कालीन राज्यकर्त्यांवर टीका सुरू आहे. मिशेलच्या एका खासगी विमानातून त्याला दुबईतून भारतात आणले, या गैरव्यवहारातील आरोपांनंतर सहा वर्षांनी हा करार रद्द करण्यात आला आहे.

 

ऑगस्टा वेस्ट लॅण्ड प्रकरणात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात एकूण १२ व्हिव्हिआयपी हॅलिकॉप्टर खरेदीच केली होती. २०१४ मध्ये सरकारने ऑगस्टा वेस्टलॅण्डची मुळ कंपनी फिनमेक्निकिकावर इटलीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने कंपनीपासून अलिप्त करण्यात आले. सक्तवसुली संचलनालयाने या करारानंतर मिशेलने २२५ कोटींची लाच घेतल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी मिशेलची चौकशी सुरू आहे. २००७ मध्ये युपीएच्या काळात हा करार आहे. आरोप झाल्यानंतर सहा वर्षांनी हा करार रद्द करण्यात आला आहे. ऑगस्टा वेस्टलॅण्डची मुळ कंपनी फिनमैकिनावरही यापूर्वी आरोप लागले आहेत.

 

२०१६मध्ये या प्रकरणी हवाईदलाचे माजी अधिकारी एस.पी.त्यागी यांना अटक झाली होती. नोव्हेंबरमध्ये या प्रकरणी दुबईतील न्यायालयाने मिशेलच्या प्रत्यार्पणासाठी मंजूरी दिली होती. मंगळवारी दुबई सरकारने मिशेलच्या प्रत्यार्पणाचा आदेश जाहीर केला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@