विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडि.स्कूलमध्ये वाहतूक नियम, सुरक्षेबाबत मार्गदर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2018
Total Views |
जळगाव : 
 
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने मंगळवार, 4 डिसेंबर रोजी शहर वाहतूक नियंत्रण शाखा जळगाव येथील राष्ट्रपतीपदक प्राप्त पोलीस निरीक्षक मुन्सुफ खान यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियम व सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.
 
आजच्या पळापळी व धकाधकीच्या जीवनात रस्त्यावरील वाहनांचे प्रमाण व त्यांचा वेग वाढला असून यामुळे रस्त्यावर होणार्‍या दुर्घटनांचे प्रमाण खूप वाढले असून यामुळे होणार्‍या जीवित व वित्तहानी याचेही प्रमाण वाढले आहे.
 
याबाबत विद्यार्थ्यांनी जागृत व्हावे तसेच हे अपघात रोखण्यासाठी आपण कशा पद्धतीने सहाय्य करु शकतो, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखा जळगाव येथील पोलीस निरीक्षक मुन्सुफ खान हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. वाहतूक नियंत्रणाची नियमावली व ती न पाळल्यास भरावा लागणारा दंड व शिक्षा याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
 
 
यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात वाहतुकीच्या नियमांसंबंधी अनेक समस्या निर्माण होतात. त्या समस्या त्यांनी विचारून त्यांचे निरसन करून घेतले. तसेच वाहतूक नियंत्रण शाखा कशा पद्धतीने कार्य करते याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तत्पूर्वी या कार्यक्रमाच्या सुरुवातीस आलेल्या पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
 
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन संध्या देशमुख यांनी व सूत्रसंचालन स्वाती बेंद्रे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील यांचे मार्गदर्शन व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
@@AUTHORINFO_V1@@