अ‍ॅड.रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2018
Total Views |

 
 
फैजपूर ता. यावल :
 
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या तसेच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त फैजपूर येथे दीपाली ग्रुप्स, खान्देश नारिशक्ती ग्रुप आणि खान्देश जनसेवा फाउंडेशनतर्फे दीपाली चौधरी झोपे यांच्या सहकार्याने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
 
 
सकाळी अंगणवाडी नं. 74 येथे बालकांना बिस्किटे वाटप करण्यात आली. त्यानंतर सकाळी 11 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र, फैजपूर येथे गर्भवती महिला रुग्णांना फळे आणि बिस्किटांची पाकिटे वाटप करण्यात आली.
 
 
दुपारी 1 वा. पी. वाय. चौधरी प्राथमिक विद्यामंदिर येथील बालकांना बिस्किटे व खाऊ वाटप करण्यात आला. तसेच रोहिणीताई यांना वाढदिवसानिमित्त तसेच भावी वाटचालीसाठी मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
 
 
अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेश सदस्य बी. के. चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा पाटील, काँग्रेसचे वरिष्ठ सदस्य आणि मुख्याध्यापक गणेश गुरव, खान्देश जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप पाटील, भाजपा शहरचिटणीस संजय सराफ, शहराध्यक्ष युवराज चौधरी, मुख्याध्यापक संजय चौधरी, आरोग्य सहाय्यक प्रकाश सोनवणे, देवेंद्र झोप, अंगणवाडी सेविका सीमा कोल्हे, नाझीम शेख, इम्रान भाई आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय सराफ यांनी तर आभार दीपाली चौधरी झोपे यांनी केले.
@@AUTHORINFO_V1@@