प्रशासनाच्या बेफिक्रीचा फटका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2018
Total Views |

जिल्हा रुग्णालयात बुधवारी दिव्यांगांची हेळसांड


जळगाव : 
 
जिल्हा रुग्णालयातुन दिव्यांगबांधवांना प्रमाणपत्र उपलब्ध होत असते, परंतु प्रशासनाच्या बेफिक्रीने दिव्यांग रुग्णांचे आतोनात हाल बुधवार रोजी झाले. रुग्णालयाकडून कोणातीही सुविधा येथे उपलब्ध करण्यात आली नाही.
  
जिल्हा रुग्णालयात दर बुधवारी दिव्यांग बांधवांची तपासणी करुन त्यांना प्रमाणपत्र दिले जाते. दिव्यांग बांधवांना या प्रमाणपत्राचा काहीतरी लाभ होईल या आशेने त्यांचे पालक त्यांना घेवून येत असतात.
 
5 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजे पासून जिल्हयातील दिव्यांग बांधव रुग्णालयात रांगेने होते. तर काहिंना वाहनातच ठेवून त्यांच्या पालकांनी रांगेत नंबर लावून ठेवले परंतु 11 वाजले तरी कार्यालय उघडले नव्हते.
 
याबाबत चौकशी केली असता. रुग्णालयाचे अधिकारी आणि वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिकारी यांची बैठक असल्याने कामकाज होण्याची शक्यता अल्प असल्याचे समजले.
 
जर बैठक आयोजित करण्यात आली होती आणि दिव्यांग बांधवांसंबधीत कामकाज होणार नसले तर तसा फलक किंवा सुचना लावणे आवश्य होते तसेच तशी माहिती देण्यासाठी एखाद्या व्यक्तीची नेमणूक करणे आवश्यक होते.
 
परंतु प्रशासनाने तशी कोणतीही कारवाई केली नाही. बेफिक्रीचा फटका दिव्यांगांना बसला.याबाबत वैद्यकिय अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही.
 
आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला
 
माझा मुलगा रवि दिव्यांग असून त्याची शारीरीक स्थिती चांगली नाही.त्याला आज रुग्णालयात आणण्यासाठी 1 हजार रुपये खर्च करुन खाजगी वाहनाने रुग्णालयात सकाळीच आणले.
 
त्याला वाहनातच झोपवून आहोत परंतु कार्यालय बंद असून केव्हा उघडेल याची माहिती नाही.आज आमचे काम झाले नाही तर पुढील आठवड्यात पुन्हा यावे लागेल. पुन्हा आर्थिक त्रास होईल- अनिता अशोक तायडे
@@AUTHORINFO_V1@@