उमंग समाजशिल्पी महिला परिवारातर्फे मुंबईतील विधानभवनात अभ्यास दौरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2018
Total Views |

 
चाळीसगाव : 
 
विधानभवनाच्या कामकाजाची ओळख व्हावी म्हणून आ. उन्मेश पाटील प्रेरित उमंग समाजशिल्पी महिला परिवारातर्फे विधानभवन मुंबई येथे नुकताच अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला.
 
उमंग महिला परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा संपदाताई पाटील यांनी या अभ्यास दौर्‍याचे नियोजन केले होते. यात सहभागी सदस्यांनी महाराष्ट्र विधानभवनाच्या विविध विभागांना भेटी देऊन या विविध विभागांचा कारभार कशाप्रकारे चालतो, याविषयी माहिती घेतली.
 
तसेच याच कालावधीत हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे सर्व अभ्यास दौर्‍यात सहभागी महिला सदस्यांनी विधिमंडळ सभागृहात जाऊन अधिवेशन कामकाजाचा, विधिमंडळ सदस्यांना प्रश्नोत्तरे विचारणे या सर्व पद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या संस्थापिका संपदाताई पाटील यांच्या नियोजनाने आयोजित या अभ्यास दौर्‍यात पंचायत समिती सभापती स्मितल बोरसे, उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या अध्यक्षा सुवर्णा राजपूत, योगिता खैरनार, नफिसा मण्यार, संगीता देवकर, माधुरी बोरसे, उषा राजपूत, डॉ. क्रांती देसले, कीर्ती खैरनार, विजया पाटील, रोशनी चव्हाण, प्रतिभा पाटील, ज्योती पाटील, साधना पाटील, कल्पना पाखले, माधवी पाटील आदी सदस्य सहभागी झाले होते. या अभ्यास दौर्‍यातूत त्यांना माहिती मिळाली.
@@AUTHORINFO_V1@@