श्रीवर्धनमध्ये पर्यटकांची पोलीसाला मारहाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2018
Total Views |



 


श्रीवर्धन : श्रीवर्धन येथील समुद्र किनारी आलेल्या ११ पर्यटकांनी चक्क पोलीस निरिक्षकालाच मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सुरेश खेडेकर असे या पोलीस निरिक्षकाचे नाव आहे. या ११ पर्यटकांमध्ये दोन कुटुंबे होती. ही दोन कुटुंबे पुणे आणि औरंगाबादहून श्रीवर्धनच्या समुद्र किनारी प्री वेडिंग शूटसाठी आले होती.

 

श्रीवर्धनचा समुद्रकिनारा हा पर्यटकांसाठी आवडते स्थळ आहे. अनेक पर्यटक फोटोशूटसाठी या समुद्रकिनारी येत असतात. श्रीवर्धन येथील पोलीस स्टेशनमधील पोलीस निरिक्षक सुरेश खेडेकर हे पेट्रोलिंगसाठी समुद्रकिनाऱ्यावर आले होते. सुरेश खेडेकर आणि त्यांच्या जीपचालकाने त्या दोन्ही कुटुंबांची चौकशी करण्यास सुरुवात केली. चौकशी केल्यामुळे या दोन्ही कुटंबातील सदस्य चिडले.

 

त्यांनी सुरेश खेडेकर यांच्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर त्यांनी खेडेकरांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीमुळे पोलीस निरिक्षक सुरेश खेडेकर यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. मारहाणीनंतर या ११ पर्यटकांना अटक करण्यात आली आहे. या ११ पर्यटकांमध्ये काही महिलांचाही समावेश आहे. या ११ जणांपैकी दोनजण या घटनेनंतर फरार झाले आहेत.

 

पोलीसांवरील हल्ल्यांचे प्रमाण सध्या वाढत आहे. २०१५ साली ३७० पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले होते. ही माहिती २०१६ च्या गुन्हे अहवालानुसार समोर आली आहे. २०१६ साली या हल्ल्यांचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळते. २०१६ साली एकूण ४२८ पोलीसांवर हल्ले झाले होते. महाराष्ट्रातील एकूण १६३ पोलीसांवर गुन्हेगारांनी हल्ले केले होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@