भुसावळात काझी प्लॉट भागातील नागरिकांनी न.पा.च्या प्रवेशद्वाराजवळ टाकला कचरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2018
Total Views |

स्वच्छता होत नसल्याचा आरोप; न.पा. प्रशासनास दिले निवेदन


 
 
भुसावळ : 
 
शहरातील प्रभाग क्रमांक 16 व 17 मध्ये नगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी साफसफाई होत नसल्याने तसेच गटारींमधील गाळ काढण्यात येत नसल्यामुळे या प्रभागातील नागरिकांच्या घरात सकाळच्या सुमारास पाणी जाते.
 
यामुळे या भागातील नागरिकांनी अखेरीस वैतागून नगरपालिकेत लोटगाडीवर कचरा आणून प्रवेशद्वारावर टाकून रोष व्यक्त केला. सफाई करण्यात यावी, यासाठी न. पा. प्रशासनास निवेदन दिले.
 
काझी प्लॉट या भागात नगरपालिकेकडून साफसफाई होत नसल्यामुळे गटारी तुडुंब भरल्याने शनिवारी येेेथील नागरिकांचा संताप होऊन त्यांनी अखेरीस काझी प्लॉटपासून महिला व नागरिकांनी पायी चालत लोटगाडीवर कचरा आणून नगरपालिका प्रवेशद्वारासमोर टाकला.
 
यावेळी येथील नागरिकांनी नगरपालिकेच्या कारभाराविषयी टीकेची झोड उठविली. आम्ही स्वत: साफसफाई करायची का? येथे आरोग्याचा प्रश्न उभा राहू शकतो, यामुळे वेळीच लक्ष घालावे अशी भूमिका यावेळी नागरिकांनी मांडली.
 
 
नगरपालिका प्रशासनाने वेळीच या भागातील स्वच्छतेचा प्रश्न सोडवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे. न. पा. प्रशासनाच्या वतीने कार्यालयीन अधीक्षक अख्तर खान यांनी निवेदन स्वीकारले.
 
निवेदनावर शेख आसिफ शेख उस्मान, धर्मेंद्र चौधरी, धनसिंग पारधी, शकील शाह गुलाब शाह, चमेलाबाई चौधरी, शोभाबाई पारधी, शेख जाकीर शेख लल्लू, परवीन विश्वकर्मा, शेख सुलेमान शेख लुकमान, शेख सलमान शेख मुश्ताक, शेख रोशन शेख चिराग, सद्दाम खाटीक, शेख अमीर शेख हमीद, शेख इलियास शेख रफीक, शेख तौसीफ शेख कादर, समीर फिरोज शेख, वसीम शाह फिरोज शाह, सलमाबी शेख आसीफ, शमीमबी सलीम बागवान, शबानाबी, जवाहरलाल साळुंके, नजीर हुसेन तडवी, बिलाल शेख रऊफ आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.
 
दरम्यान, या नागरिकांचे निवेदन कार्यालय अधीक्षक अख्तर खान यांनी स्वीकारून त्यांनी त्वरीत या भागातील स्वच्छता करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
@@AUTHORINFO_V1@@