मीडियातील अपेक्षित तटस्थता नावालाही शिल्लक नाही : अ‍ॅड. सुशील अत्रे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2018
Total Views |

 
चोपडा :
 
भारताला आक्रमण नवीन नाही. आपल्या देशावर आक्रमण झाली ती कमी जास्त कालखंडात आपण परतवली आहेत. तसेच सोशल मीडियाचे आक्रमणे परतवले जाईल. माध्यम (मीडिया) निर्विकार असणे आवश्यक आहे.
 
परंतु परिस्थिती जशीची तशी राहिली नाही.तटस्थता माध्यमांना ठेवता आली नाही. त्यामुळे जीवनावर आक्रमण होत आहे. मीडियाने ‘स्व’त्व काढून घेऊन आक्रमण सुरु ठेवले पाहिजे.
 
वृत्तवाहिन्यांचे आपण इंधन आहोत. मीडियातील तटस्थता नावालाही शिल्लक राहिलेली नाही. समाजात दुही निर्माण करण्याचे काम सोशल मीडिया करीत आहे. अश्लीलता व हिंसाचारदेखील सोशल मीडियामुळे वाढतो आहे.
 
सोशल मीडियाचे संस्कृतीवर होणारे आक्रमण गांभीर्याने घेऊन हटविण्याची गरज आहे, असे मत अ‍ॅड. सुशील अत्रे यांनी येथे केले.
येथील नगर वाचन मंदिराच्या ग्रंथालय सप्ताहात 52 व्या शारदीय व्याख्यानमालेच्या पाचवे पुष्प अ‍ॅड.सुशील अत्रे ( जळगाव) यांनी ‘सोशल मीडियाचे आक्रमण’ या विषयावर गुंफले.
 
वक्त्यांचे स्वागत वाचनालयाचे अध्यक्ष आशिष गुजराथी यांनी केले. परिचय अ‍ॅड. अशोक जैन यांनी करुन दिला. आजच्या व्याख्यानाचे प्रायोजक नरेंद्र तोतला, एस.टी.कुलकर्णी, प्रा.रुपेश नेवे यांचा सत्कार वक्ते अ‍ॅड.अत्रे यांनी केला. मंचावर प्रा.एस.टी.कुलकर्णी, डॉ.परेश टिल्लू उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@