शेंदुर्णी नगरपंचायतीची निवडणूक भाजपा, राष्ट्रवादीला प्रतिष्ठेची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2018
Total Views |


प्रचारात रंगत वाढली, मात्र अद्यापही जाहीर सभा नाहीच


शेंदुर्णी ता.जामनेर : 
 
शेंदुर्णी नगरपंचायतीची पहिल्यांदाच निवडणूक असल्याने राजकीय पक्षांसह उमेदवारांनीही निवडणूक प्रतिष्ठेची व राजकीय वर्चस्वाची केल्याने नाते-गोत्यांसह वैयक्तिक संबंधावर मतदान वळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
 
शेंदुर्णी नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणूक प्रचारात भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, अपक्ष उमेदवारांनी प्रचारात रंगत आणली आहे. मात्र, भाजपा राष्ट्रवादी काँग्रेससाठी शेंदुर्णी नगरपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.
 
परंतु, जाहीर सभा अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाकडून घेण्यात आलेली नाही तरी लवकरच जाहीर सभेचे आयोजनही करण्यात येणार असल्याचे राजकीय पक्षांकडून बोलण्यात येत आहे.
 
प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने भाजपातर्फे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीश महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ तर राष्ट्रवादीतर्फे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, काँग्रेसतर्फे संदीप पाटील, शिवसेनेतर्फे आ. किशोर पाटील यांनी हजेरी लावून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
 
शेंदुर्णी नगरपंचायत होण्याअगोदर ग्रा.पं.वर भाजपाची सत्ता होती. जलसंपदामंत्री ना. महाजन यांच्या माध्यमाने सुमारे 35 कोटींचा निधी आणून विकास साधला गेला.
 
त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीत पूर्ववत सत्ता आपल्याच ताब्यात राहावी म्हणून व केलेल्या विकासकामांच्या जोरावर मतदार आपल्यालाच साथ देतील म्हणून भाजपासाठी निवडणूक प्रतिष्ठेची व तेवढीच महत्त्वाची आहे.
 
तसा मतदारांकडून प्रतिसादही मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. तरी ग्रा.पं.निवडणुकीत आपल्या ताब्यातील गेलेली सत्ता पुन्हा नगरपंचायत निवडणुकीत पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान व सत्ता आपल्या ताब्यात यावी, म्हणून राष्ट्रवादीतर्फे कसोशीने प्रयत्न सुरू आहे.
 
शिवसेना, मनसे, अपक्षही नशीब आजमावत आहे. त्यामुळे जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या महत्त्चाचे गाव असलेल्या शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष असले तरी ना. गिरीश महाजन यांनी जळगाव, जामनेर, पालघरच्या निवडणुकीचा विजय पाहता शेंदुर्णीतही विजय निश्चित मानला जात आहे. तरी त्याला विरोधक किती विजयरथ रोखण्यासाठी यशस्वी होतात, याकडे लक्ष लागले आहे.
राजकीय पक्षाची प्रचारात आघाडी
 
भाजपातर्फे ज्येष्ठ नेते उत्तमराव थोरात, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, प्रकाश झंवर, नारायण गुजर, अमृत खलसे यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रभाग प्रचारात आघाडी मारली आहे तर राष्ट्रवादीतर्फे संजय गरूड, सागरमल जैन, सुधाकर बारी, शांताराम गुजर, मधुकर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराचा झंझावात सुरू आहे.
 
शिवसेनेतर्फे विलास बारी, भैया सूर्यवंशी, अशोक बारी यांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. मनसेतर्फेही जिल्हा पदाधिकारी डॉ. विजयानंद कुळकर्णी, डॉ. भक्ती कुळकर्णी, प्रकाश चौधरी, जितेंद्र जाधव, शरद बारी यांच्या नेतृत्वात प्रचारात आघाडी घेतली आहे.
 
 
तर अपक्ष उमेदवारांनीही आपापल्या परीने प्रचारात रंगत आणून मतदार पोहोचण्याचे प्रयत्न करीत आहे. भाजपा विकासाच्या मुद्यांवर निवडणुकीत सामोरे जात आहे तर राष्ट्रवादी पाणी योजनेचा विषय घेऊन निवडणुकीला सामोरी जात आहे.
 
 
शिवसेना, मनसे, अपक्ष हे भाजपा, राष्ट्रवादी यांच्याविरोधात रणशिंग फुंकून गावातील मूलभूत समस्या नागरिकांना देऊन विकास साधण्यासाठी निवडणुकीला सामोरे जात आहेत.
 
भाजपा, राष्ट्रवादीचे सर्वाधिक उमेदवार
 
नगरपंचायत निवडणुकीत 17 प्रभाग व नगराध्यक्षपदासाठी भाजपाने स्वबळावर सर्व उमेदवार दिले आहे. राष्ट्रवादीने काँग्रेससोबत आघाडी करून 16 उमेदवार नगराध्यक्षपदासह 16 उमेदवार राष्ट्रवादी तर काँग्रेसने 2 उमेदवार दिले. तसेच शिवसेना व मनसेने नगराध्यक्षासह 9 उमेदवार उभे केले आहे.
उमेदवारांकडून मतदारांशी संपर्क
 
राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांकडून सकाळी व संध्याकाळी नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह प्रभागात जाऊन मतदारांशी संपर्क साधत आहे. तसेच प्रचार यंत्रणा इतर माध्यमांद्वारे हायटेक करण्यात आली आहे. त्यात रिक्षाद्वारे भोंगे लावून मतदारांपर्यंत संपर्क साधण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@