साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2018
Total Views |
 

नवी दिल्ली : साहित्य अकादमी पुरस्कार २०१८ या वर्षाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारांमध्ये मराठी भाषा समीक्षक म. सु. पाटील कोकणी भाषेसाठी परेश नरेंद्र कामत यांची निवड झाल्याने सर्व स्तरातून आनंद व्यक्त होत आहे. २०१८ साठीच्या 'भाषा सन्मान' पुरस्कारासाठीचा मान मराठी लेखिका डॉ. शैलजा बापट यांना मिळाला आहे. 

 
 

क्रिटिकल स्टडी ऑफ ब्रह्मसूत्राज' हा तीन खंडांचा संशोधनपर ग्रंथ त्यांनी लिहिला. शुद्ध अद्वैत आणि केवल अद्वैत वेदांतावर आधारित पुस्तके त्यांनी लिहिली. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे त्यांची "प्रोफेसर एमिरेट्‌स' म्हणून निवड झाली होती. एक लाख रुपये, ताम्रपट आणि सन्मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. साहित्य अकादमीतर्फे जाहीर केल्या जाणाऱ्या २०१८ या वर्षासाठीच्या पुरस्कारांची बुधवारी घोषणा झाली. देशभरातील सर्व भाषां उत्कृष्ट वाङ्‌मयीन कलाकृतींची निवड केली जाणाऱ्या या पुरस्कारांमध्ये मराठी भाषेसाठी म. सु. पाटील लिखित "सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध (वाङ्‌मयीन समीक्षा)' ग्रंथाची निवड झाली. कोकणी भाषेतील कवी परेश नरेंद्र कामत यांच्या "चित्रलिपी' या काव्यसंग्रहाची निवड करण्यात झाली. एक लाख रुपयांचा धनादेश, ताम्रपट आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दरम्यान, २९ जानेवारी २०१९ रोजी दिल्लीत अकादमीतर्फे आयोजित होणाऱ्या वार्षिक "शब्द महोत्सवा'त हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. २४ भाषांमधील विविध कलाकृतींना पुरस्कार जाहीर करण्यात केले आहेत. यात सात काव्यसंग्रह, सहा कादंबऱ्या, सहा लघुकथा संग्रह, तीन समीक्षा ग्रंथ व दोन निबंधांचा समावेश आहे.

 
 
 

हिंदीमध्ये रहमान अब्बास यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. चित्रा मद्गल यांच्या पोस्ट बॉक्स नं. २०३ नालासोपारा या कादंबरीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. इंग्रजीमध्ये अनीस सलीम यांच्या द ब्लाइंड लेडीज डीसेंडेंट्स या कादंबरीसाठी पुरस्कार देण्यात आला. संस्कृतमध्ये मम जननी या कविता संग्रहासाठी रमाकांत शुक्ल यांना अकादमी पुरस्कार देण्यात येणार आहे. अकादमीचे सचिव श्रीनिवास राव यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकाळी मंडळाच्या बैठकीत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@