Meizu कंपनीचे स्मार्टफोन भारतात लॉन्च!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2018
Total Views |



नवी दिल्ली : भारतात टेलिकॉम क्षेत्राचा दिवसेंदिवस विकास होताना दिसून येत आहे. यामुळे अनेक टेलिकॉम कंपन्या भारतात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्नशिर आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात चायना कंपन्याच वर्चस्व आपल्याला दिसून येते. अशातच अजून एका कंपनीची भर पडली आहे. चीनची कंपनी Meizu ही भारतीय बाजारात उतरली असून आपले Meizu M16th, Meizu M6T, Meizu C9 असे हे स्मार्टफोन्स आज लॉन्च केले आहेत. Meizu या मोबाईल कंपनीने आपल्या स्मार्टफोनच्या विक्रीसाठी रिलायन्स जियो व अमॅझॉनशी करार केला आहे. यामुळे हा स्मार्टफोन भारत पहिल्या दहा दिवसात अवघ्या ४,९९९ रुपयांमध्ये मिळणार आहे.

 

Meizu M6T मध्ये 13MP + 2MP चे दोन कॅमेरे असून Sony IMX278 RGBW फोर-कलर सेन्सर असणार आहेत. तर मल्टी फ्रेम नॉयस रिडक्शन टेक्नोलॉजी यामध्ये देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची बॅटरी ३३०० mAh इतक्या क्षमतेची असणार आहे. यासह अनेक फिचर यामध्ये देण्यात आले आहेत. तर Meizu M16TH स्मार्टफोनमध्ये १२८ GB इंटरनल मेमरी असून ८ GB रॅम असणार आहे. १२MP आणि २०MP चे दोन कॅमेरे या स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहेत. तर ३०१० mAh इतक्या क्षमेतची बॅटरी देण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@