महिंद्राची नवीन इलेक्ट्रिक कार बाजारात येणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2018
Total Views |



एकदा चार्ज केल्यानंतर १२०-१४० किलोमीटरपर्यंत चालणार

 

नवी दिल्ली : महिंद्रा कंपनीने बॅटरीवर चालणारी नवीन इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. ही इलेक्ट्रिक कार एकदा चार्ज केल्यानंतर १२०-१४० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. SUV KUV100 EV असे या कारचे नाव असून पुढील वर्षी ही कार बाजारात दाखल होऊ शकते. विशेष म्हणजे या कारमध्ये नवीन टेक्नॉलॉजीच्या बॅटरीचा उपयोग केल्याने बॅटरी कमी वेळेत चार्ज होते आणि जास्त वेळ टिकते.

 

महिंद्राने यापूर्वी eVertio ही कार विक्रीसाठी आणली होती. अशातच ही नवीन इलेक्ट्रिक कार बाजारात आणली आहे. या कारचे इंजिन ४०.२ bhp एवढी ऊर्जा निर्माण करू शकते. तर या कराचा सर्वाधिक वेग १०० किमी प्रति तास असणार आहे. याची बॅटरी ० ते ८० टक्के चार्जिंगसाठी एका तासापेक्षा कमी वेळ लागणार आहे. तसेच या कारच्या इंटीरियरमध्ये देखील महत्वाचे फिचर दिले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@