जामनेरचे शर्मा, महाजन यांचा सत्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2018
Total Views |

एव्हरेस्टचा बेस कॅम्प ट्रेक केल्याने मंत्री महाजन यांच्याकडून गौरव

 
 
जामनेर :
 
न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक कपिल शर्मा व सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर विशाल महाजन यांनी जगातील सर्वात कठीण समजला जाणारा एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक अवघ्या 14 दिवसांत पूर्ण केल्याने नुकतेच ना. गिरीश महाजन यांनी त्यांचा मिळालेल्या यशाबद्दल कौतुक करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
 
ट्रेक समुद्रसपाटी पासून उंची 5380 मीटर आहे. काठमांडू (नेपाळ) पासून विमानाने लुकला या जगातील सर्वात उंच विमानतळावर उतरून लूकपासून त्यांनी आपल्या एव्हरेस्ट बेस कॅम्प या ट्रेकच्या चढाईला सुरुवात केली.
 
9 दिवस चढाईला लागले व उतरण्यासाठी त्यांना 5 दिवसांचा कालावधी लागला. कमी तापमान, ऑक्सिजनचे प्रमाण सुद्धा कमी, पिण्यासाठी अत्यंत थंड पाणी अशा प्रतिकूल परीस्थितीतसुद्धा 3 महिन्यांपासून केलेला खडतर सरावाच्या जोरावर त्यांनी हा खडतर ट्रेक पूर्ण करून जामनेरवासीयांची मान उंचावली.
 
कपिल शर्मा व विशाल महाजन हे स्टेटस क्लब व कलाविष्कार मंडळ या क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्‍या संस्थेचे संचालक आहेत.
@@AUTHORINFO_V1@@