बंगळूरुमध्ये हायड्रोजनचा स्फोट, एका शास्त्रज्ञाचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2018
Total Views |


 


बंगळूरु : देशातील नामांकित शिक्षण संस्था म्हणून ओळख असलेल्या बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये स्फोट झाला आहे. यामध्ये एका शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. दुपारच्या सुमारास एका हायड्रोजन सिलिंडरचा स्फोट झाला. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

 

हायड्रोजनच्या सिलिंडरच्या स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की, एका शास्त्रज्ञाचा जागीच मृत्यू झाला. मनोज कुमार असे मृत्यूमुखी पडलेल्या शास्त्रज्ञाचे नाव आहे. या स्फोटात तीन संशोधक गंभीर झाले. अतुल्य, कार्तिक आणि नरेश कुमार अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सध्या जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. हे चौघेही जण 'सुपरवेव टेक्नॉलजी' नावाच्या स्टार्ट अपमध्ये काम करत होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या एरोस्पेस लॅबमध्ये हा स्फोट झाला. “घटनास्थळी गॅस किंवा आगीची कोणतीही माहिती मिळाली नाही.” असे लॅबच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@