गुलशन ग्रोव्हर होणार एफटीआयआयचे नवे अध्यक्ष?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2018
Total Views |

 


पुणे : व्यस्त वेळापत्रकामुळे एफटीआयआयच्या अध्यक्ष पदाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता एफटीआयआयच्या अध्यक्षपदी 'बॅड मन' अभिनेते गुलशन ग्रोवर यांच्या नावाची चर्चा होत आहे. त्यांनी आतापर्यंत तब्बल ४००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे चित्रपट क्षेत्रात येण्याआधी ते अध्यापन क्षेत्रात कार्यरत होते. मात्र, गुलशन ग्रोवर यांनी याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

 

गुलशन ग्रोवर हे हिंदी चित्रपट सृष्टीमधील एक नामवंत अभिनेते आहेत. त्यांनी तब्बल ४००हून अधिक चित्रपटामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. अध्यापनाच्या क्षेत्रात कार्यरत असताना संजय दत्त, विजया पंडित, सनी देवल, कुमार गौरव आणि टीना मुनीम यांना गुलशन ग्रोवर यांनी अभिनयाचे प्रशिक्षण दिले आहे.दिल्लीच्या श्रीराम कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी मिळवल्यानंतर त्यांनी रोशन तनेजांकडे अभिनयाचे प्रशिक्षण घेतले होते. 'राम लखन'मधील त्यांची भूमिका विशेष गाजली होती.

 

एफटीआयआयचे अध्यक्ष म्हणून अभिनेते गुलशन ग्रोवर यांच्या नावाची चर्चा सुरू असली तरी केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाकडून काही सूचना आलेली नाही, असे स्पष्टीकरण एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिले. माहिती आणि प्रसारण विभागाकडून आम्हाला काही सूचना नाही. अध्यक्षपदी निवड होताच आम्हाला सांगितले जाईल. सध्यातरी संस्थेच्या पातळीवर याबाबत काही माहिती नाही, असे कँथोला यांनी स्पष्ट केले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@