सी.एम.चषक स्पर्धांमुळे उदयोन्मुख खेळाडूंना संधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2018
Total Views |

चोपड्यात सी.एम.चषक स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी खा. रक्षाताई खडसे यांचे प्रतिपादन


 
चोपडा : 
 
सी. एम. चषक ग्रामीण भागासाठी लाभदायक ठरणार आहे. आपल्या भागातील उदयोन्मुख खेळाडू त्यामुळे राज्यस्तरापर्यंत चमकू शकतील. जिल्ह्यातील युवकांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहोत.
 
राजकारण बाजूला ठेवून विकासाला आपण वाहून घेऊ. ग्रामीण भागातील विद्यार्थी, तरुण यांचे सुप्तगुण पुढे येऊन चांगला खेळाडू देशाला मिळाला पाहिजे. चोपडा विधानसभा मतदारसंघात 5200 खेळाडू यात सहभागी झाल्याचा आपणास आनंद असून तसेच भुसावळला 8 ते 12 डिसेंबरदरम्यान बहिणाबाई महोत्सव होत आहे. त्याला उपस्थिती देण्याचे आवाहन खा. रक्षाताई खडसे यांनी केले.
 
 
शहरातील महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या प्रांगणावर सी.एम.चषक स्पर्धांचे उद्घाटन प्रसंगी खा. खडसे बोलत होत्या. त्यांच्या हस्ते 100 मीटर धावणे, कॅरम व कबड्डी या खेळांचे यथोचित उद्घाटन करण्यात आले.
 
 
प्रास्ताविक भाजयुमो जिल्हा सरचिटणीस राकेश फेगडे यांनी केले. यावेळी पं.स. सभापती व भाजप तालुकाध्यक्ष आत्माराम म्हाळके यांनीही मनोगत व्यक्त केले.
 
कार्यक्रमात खा. रक्षाताई खडसेंचे स्वागत भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. स्मिता पाटील यांचे स्वागत भाजयुमो शहराध्यक्ष तुषार पाठक यांनी केले
 
. उर्वरित अतिथींचे स्वागत सुनील सोनगिरे, अमित तडवी, अमोल पाटील, कृष्णा बाविस्कर, योगेश बडगुजर, मोहन महाजन, प्रा. भरत सोनगिरे आदींनी केले. खा. खडसेंनी क्रीडा समन्वयक आर.पी.आल्हाट व कॉलेजच्या क्रीडा संचालक प्रा.क्रांती वाघ, क्रीडा शिक्षक अशोक निंबाळकर, गुणवंत वाघ, साहेबराव पाटील, अशोक साळुंखे यांचा सत्कार केला.
 
 
कार्यक्रमास तहसीलदार दीपक गिरासे, नाशिक विभाग ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रदीप पाटील, शहराध्यक्ष नरेंद्र पाटील, सुनील सोनगिरे, नगरसेवक बापू चौधरी, गजेंद्र जायस्वाल, सरचिटणीस पंकज पाटील, हनुमंत महाजन, जगन्नाथ बाविस्कर, मगन बाविस्कर, भारती क्षीरसागर, प्राचार्य डी.ए.सूर्यवंशी, अजय राजपूत, राकेश पाटील, डॉ.विकी सनेर, अनिल पाटील, ताराबाई पाटील, रंजना नेवे, शरिफा तडवी, शर्मिला जैन, लक्ष्मण पाटील, डॉ. राहुल पाटील, वना भील, डॉ. आशिष पाटील, मनोहर बडगुजर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राधेश्याम पाटील यांनी केले.
@@AUTHORINFO_V1@@